alum

दैन्यंदिन जीवनात तुरटीचे असलेले महत्व

हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेक वेळा आपल्या घरातील इतर मोठ्या सदस्यांकडून तुरटीचा वापर हा केला जातो. स्फटिकी रंगाची असलेली तुरटी हि आपल्या शरीरावर असलेल्या जखमांना बॅक्टरीया यापासून दूर ठेवण्याचे काम करते . म्हणूनच कुठेही छोटीशी जखम झाली तर लगेच तुरटी आणून त्या जखमेवर फिरवली जाते . कारण जखमेचे संरक्षण हे इतर जंतुसंसर्गापासून झाले पाहिजे.तुरटीला आलम असेही म्हंटले जाते. सामान्य पणे पांढऱ्या रंगाची असलेली तुरटी हि खूप गुणकारी आहे . त्याचे औषधीय गुणधर्म सुद्धा खूप आहेत . त्यामुळे तुरटीबाबत काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …

तुरटी हि साधारण रंगहीन आहे. पावसाळ्याच्या दिवसांत तुरटी हि प्रत्येक घरात वापरली जाते. तुरटीचे रासायनिक नाव आहे पोटॅशियम सल्फेट. पावसाळ्यात येणारी गढूळ पाण्यापासून सरंक्षण करण्यासाठी तुरटीचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. एकदा जरी गढूळ पाण्यावर तुरटी हि फिरवली गेली तर त्यावेळी त्याच्यातील काही अंश तळाशी राहण्यासाठी तुरटीचा वापर हा केला जातो. सध्याच्या युगात तुरटी हि जास्त वापरली जात नाही , कारण पाणी शुद्ध करण्यासाठी  यंत्रांचा समावेश केला जात आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये तुरटीचा वापर हा केला जात असे.

आपले दात निरोगी राहण्यासाठी आयुर्वदात तुरटीचा वापर हा केला जात असे. पूर्वीच्या काळी कडुलिंबाची काठी , आणि तुरटी हि एकत्र करून त्याचा वापर हा आपल्या दातांच्या स्वच्छतेसाठी करत असत. दातांमध्ये असलेल्या कॅव्हिटी पासून आणि दात दुखण्याच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. तसेच आपल्या तोंडाला जर जास्त प्रमाणात दुर्गंधी येत असेल तर अश्या वेळी त्या दुर्गंधीपासून दूर राहण्यासाठी तुरटीचा वापर होतो. काही दिवस दररोज याचा वापर केला तर मात्र तोंडाच्या दुर्गंधी पासून बरीच सुटका होऊ शकते. एका ग्लास मध्ये गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये काही प्रमाणात तुरटी टाकून दयावी.  चिमूटभर मीठ याच वापर करावा. हे पाणी थंड झाले कि , याचा वापर हा चुळा भरण्यासाठी केला असता, दुर्गंधी हि आपोआप दूर होण्यास मदत होऊ शकते.