The importance of carrots in the diet
|

गाजराचे आहारात असलेले महत्व

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।   आपल्या आहारात जर वेगवेगळे पदार्थ असतील तर आपल्या शरीराला जास्त फायदेशीर असते. कंदमुळे हे आपल्या शरीराला जास्त प्रमाणात लाभकारी आहेत. आपल्या आहारात जरी ज्यूस चे प्रमाण योग्य ठेवले तरी ते शरीराला ऊर्जा मिळत जाते. ज्यूस मध्ये असलेले पोषक घटक  तसेच त्यामध्ये असलेले अँटी -ऑक्सीडेन्ट आणि व्हिटॅमिन सी त्वचेसह इतर फायदे देतात. लोक डाळिंब, ऊस, मोसंबी किंवा फळाचे मिश्रित ज्यूस पितात. गाजर सुद्धा आपल्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया वाढवण्यास मदत करते. त्यामुळे गाजराचा ज्यूस पिणं हे आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे.

दररोज आपल्या आहारात जर गाजर खाल्ले किंवा गाजर सॅलड खाल्ले तर आपल्याला गाजरापासून व्हिटॅमिन ए , बी , मिळते.  आपण गाजराचे ज्यूस पीत असाल किंवा ह्याला सॅलड रूपाने सेवन करत असाल तर या मध्ये असलेले घटक शरीराला मिळतात. गाजरामध्ये व्हिटॅमिन ,के,बी  या सह अनेक खनिजे आढळतात. अशा परिस्थितीत नियमितपणे गाजराचे सेवन केल्याने अनेक फायदे मिळतात.

आपण चेहऱ्यावर तजेलपणा येण्यासाठी काय काय करत नाही. महागड्या क्रीम वापरतो पण जर दररोज गाजराचा ज्यूस पीत असाल किंवा सॅलड खात असाल तरी आपल्या चेहऱ्यावर चमक येते. गाजर हे रक्तातील विषारी द्रव्य कमी करण्यास मदत करते. तसेच आपल्या चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यास मदत करते. तसेच आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हिमोग्लोबिन वाढण्यास मदत करते. आपल्याला जर खोकला हा जास्त प्रमाणात येत असेल तर त्यावेळी गाजराचा रस हा तयार करून द्यावा.