Wednesday, January 4, 2023

आपल्या आहारात जिरांचे असलेले महत्व

आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात जिऱ्याचे फायदे खूप आहेत .जिऱ्याचे पाणी आरोग्याच्या दृष्टीने  प्रभावी आहे.  आपल्या दररोज च्या आहारात आणि भाज्यांमध्ये  जिऱ्यांचा वापर हा केला जातो.  त्यामुळे स्वयंपाकाला खूप छान अशी चव येते. त्यामुळे जिऱ्याचा वापर हा आरोग्यसाठी जास्त लाभाकरक आहेत. जिरे आहारात असणे हे जास्त महत्वाचे आहे. कारण त्यांच्यामधून अनेक पौष्टिक घटक मिळतात.  आपल्या आहारात जर जिऱ्याचा वापर केला तर मात्र आपल्या रोगप्रतिकार शक्तीत वाढ होण्यास मदत करते.

बुद्धकोष्ठीता —

आपल्याला जर काही प्रमाणात बुद्धकोष्टिता याचा त्रास जाणवत असेल तर त्या वेळी आपल्या आहारात जिऱ्याचा वापर हा जास्त वेळा केला गेला पाहिजे. जिरे हे आपल्या पचन तंत्राला बुष्ट करून कितीही कठीण पदार्थ असतील तरी त्याचे पचन करण्याचे काम जिरे करत असते.

चरबीचे प्रमाण —

जिरे आपल्या आहारात असलेल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यास सहकार्य करते . त्यामुळे जिऱ्याचे पाणी हे सकाळी उठल्या उठल्या अनोश्यापोटी पिणे जास्त आवश्यक आहे .

इम्युनिटी वाढण्यास मदत —-

जिरे हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे महत्वाचे काम करते त्यामुळे अनेक रोगांपासून दूर राहण्यास जिरे आवश्यक ते कार्य करते.

ऍनिमिया —

जिऱ्यामध्ये आयरन चे प्रमाण हे जास्त असते . त्यामुळे ते आपल्या शरीराला दूर ऍनिमिया या आजारापासून दूर ठेवण्यास मदत करते.


आवडल्यास नक्की शेअर करा

हे तुम्ही वाचायलाच हवे...