nachni

मधुमेहांसाठी आहारात नाचणीचे असलेले महत्व

हॅलो आरोग्य ऑनलाईन । नाचणी हि खूप उष्ण असते . त्याचा वापर हा हिवाळ्याच्या दिवसांत जास्त लाभकारी ठरतो. शरीरातील तापमान योग्य राहण्यास  नाचणी मदत करते. पूर्वीच्या काळी नाचणी सत्व किंवा नाचणीची कडी करून प्यायला देत होते.  हिवाळा असेल तर त्यावेळी आपल्या आहारात नाचणीचा वापर केल्याने आपल्या शरीरात उष्णतेचे प्रमाण हे कमी होत नाही. त्यामुळे नाचणी हि खूप महत्वाची मानली जाते . लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळे जण नाचणीचं आहारात समावेश करू शकतात.

नाचणीचे उत्पन्न हे कोकण भागात हे जास्त प्रमाणात घेतले जाते. नाचणी हि आरोग्यास  उष्णता तर देतेच तसेच आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करते . मधुमेही लोकांसाठी नाचणीचे खूप सारे फायदे आहेत .आजकाल खूप सारी लोक हे मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त आहेत . अश्या वेळी मधुमेही लोकांनी आपल्या आहारात योग्य पदार्थांसोबत नाचणीचा समावेश करणे जास्त आवश्यक आहे. आपल्या शरीरात ज्यावेळी इन्सुलेशन ची निर्मिती कमी कमी होत जाते. अश्या वेळी आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण हे वाढत जाते . त्यामुळे मधुमेह हा आजार होतो. ज्या लोकांना मधुमेह आहे. त्या लोकांनी खाण्या – पिण्याच्या सवयी या पूर्णपणे बदलल्या गेल्या पाहिजेत. खाण्याच्या सवयी मध्ये जरा जरी निष्काळजीपणा केला तर मात्र मधुमेहाचे प्रमाण हे वाढू शकते . जर तुम्हाला नॉर्मल मधुमेह आहे तर त्यावेळी जास्त टेन्शन नसते . पण ज्यावेळी टाइप २ चा मधुमेह असेल अश्या वेळी खूप काळजी हि घ्यावी लागते .

आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत बरीच लोक हे मधुमेह या आजाराने ग्रस्त आहेत . जर हायपर टेन्शन आणि लठ्ठपणा यासारख्या समस्या जास्त प्रमाणात असतील तर मात्र मधुमेहाचा त्रास हा जास्त वाढत जातो . नाचणीमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे आपल्या शरीरात इन्सुलेशन ची निर्मिती हि जास्त होते . नाचणीमुळे व्हिटॅमिन डी, प्रोटिन्स, फॅट्स, कार्बोहाडट्रेट, फायबर्स, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, सोडिअम आणि झिंक अशा पोषक घटकांचा मुबलक पूरवठा शरीराला होतो. विशेष म्हणजे हे सर्व घटक एकमेकांना पूरक आणि पोषक असतात. नाचणीमध्ये असलेले मॅग्नेशियम हे आपल्या शरीरात इन्सुलेशन निर्मितीसाठी फार लाभकारी आहे .