The importance of outdoor play for children's development
|

मुलांच्या विकासासाठी मैदानी खेळाचे असलेले महत्व

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  आजकाल सगळीकडे पाहायला गेलो तर सगळीकडे फक्त आणि फक्त मोठ्या मोठ्या इमारतीचं दिसतात. अनेक ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी साधे मैदान सुद्धा उपलब्ध नाही. अश्या वेळी मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी खूप सारे प्रयत्न करावे लागतात. एखादी जागा मिळालीच तर त्या जागेवर नेहमीच खेळता येत असेलच असे नाही. पण मुलांच्या वाढीसाठी त्यांच्या बौद्धिक विका

सासाठी मुलांना मैदानी खेळ खेळता आले पाहिजेत.

आजकाल अनेक मुले बाहेर खेळताना दिसत नाहीत. त्यांच्याकडे मोबाइल आणि टीव्ही याच्या सोयी सुविधा असल्याने मुलांना स्वतःला सुद्धा बाहेर खेळायला जाण्यात इंटरेस्ट वाटत नाही. अनेक मुले तर सतत कोणत्या ना कोणत्या अभ्यासात बुडून गेलेली दिसतात. त्यांना आई वडील इतके व्यस्त करून टाकतात. सतत कोणता ना कोणता क्लास तसेच सतत कोणत्या ना कोणत्या अभ्यासाचे टेन्शन त्यामुळे मुले नेहमी टेन्शन मध्ये दिसतात. अश्या वेळी त्यांना थोड्या प्रमाणात का होईना बाहेर सोडले पाहिजे.

मैदानी खेळामध्ये मुळात मुलाना आनंद वाटो. त्याच्या शरीराची हालचाल होते. मोठ्या प्रमाणात व्यायाम हा होतो. मोकळ्या हवेत जरा खेळण्याने त्याच्या बौद्धिक विकासात वाढ होण्यास मदत होते. तसेच बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेण्याचे कसब त्यांच्यात निर्माण होते. चार मुलांच्यात खेळण्याचा आनंद हा वेगळाच असतो. एकमेकांशी कश्या पद्धतीने जुळवून घेता येऊ शकते. याचे ज्ञान मिळते. मुळात त्याच्या शरीराला खूप फायदे होतात.