The importance of sour sweet tamarind in the diet

आंबट गोड चिंचेचे आहारात असलेले महत्व

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात वेगवेगळ्या पदार्थाचा समावेश केल्यानंतरचा आपल्या शरीराला वेगवेगळे पोषक घटक मिळणार आहेत. आहारात असे पदार्थ समाविष्ट केले गेले पाहिजेत कि , जे निसर्गतः हे फळे किंवा पदार्थ उपलब्ध आहेत . आहारात समाविष्ट करण्यात येणाऱ्या फळांमध्ये रानटी फळाचा सुद्धा वापर हा केला गेला पाहिजे . रानटी फळे हि आपल्याला जीवनस्त्वव तसेच शरीराला पोषक घटक पण देतात . रानात असलेली गाभुळलेली किंवा पिकलेली चिंच याचे काय महत्व आहे ते जाणून घेऊया…

— चिंच हि मुलीचा सर्वात आवडता पदार्थ आहे. चिंचेचे नाव जरी काढले तरी अगदी तोंडाला पाणी सुटते. पण अश्या या आंबट गोड चिंचेचे गुणधर्म सुद्धा अफलातून आहेत . त्याचे महत्व आणि त्याचे फायदे जाणून घेऊया …

— चिंचेच्या नियमित सेवनाने केसांचे आरोग्य सुदृढ राहून केसगळती थांबते. यामुळे केस मजबूत, लांब, दाट आणि काळेभोर होण्यास मदत होते.

— चिंचेमधील हाइड्रोसिट्रिक आम्लामुळे मानवी शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. चिंचेचे नियमित सेवन शरीराचा स्थूलपणा कमी करण्यास मदत करते. वजन कमी करायचे असेल तर सुद्धा चिंचेचा वापर करावा

— आहारातील अनेक पदार्थ बनवण्यासाठी चिंचेचा वापर केला जातो. चिंच हि फार आंबट असते. पदार्थाला थोडी आंबट आणि गोड चव येण्यासाठी चिंचेचा वापर केला जातो.

— चिंचेमधील हाइड्रोसिट्रिक आम्लामुळे मानवी शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. चिंचेचे नियमित सेवन शरीराचा स्थूलपणा कमी करण्यास मदत करते.

— शरीराची पचनशक्ती कमी असल्यास चिंच खाणं फायदेशीर ठरतं. चिंचेमधील फाइबर, टार्टेरिक आम्ल आणि पोटेशियम हे घटक पचनशक्ती मजबूत करण्यासाठी कार्य करतात.

— चिंचेचे नियमित सेवन शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते व मजबूत होते. चिंचेतील ‘क’ जीवनसत्व अनेक रोगांना शरीरापासून दूर करण्यास मदत करते.