sunflower oil

सूर्यफुलाचे दैन्यंदिन जीवनातील केसांसाठी असलेले महत्व

हॅलो आरोग्य ऑनलाईन । सूर्यफूल हे पीक जास्त करून हिवाळ्याच्या दिवसांत घेतले जाते. सूर्यफूल हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. सूर्यफुलाचा आहारात वापर केला तर त्याचे खूप फायदे होतात . सूर्यफूलाचे तेल हे दैन्यंदिन गरजेची वस्तू बनली गेली आहे. सूर्यफूल हे औषधी तर आहेच तसेच त्याचे असलेले औषधी गुणधर्म हे आरोग्यासाठी गुणकारी आहे.

 

आहारात तर सूर्यफुलाचा वापर हा केला जातोच तसेच त्याचा वापर हा केसांसाठी सुद्धा केला जातो. तेलात भरपूर प्रमााणात अँटीबॅक्टरील , अँटिव्हायरल आणि अँटी ऑक्सिडंट हे गुणधर्म असतात. जे गुणधर्म केसांच्या वाढीसाठी तसेच त्याच्या सौदर्यासाठी सुद्धा वापर केला जातो. हे तेल खाण्याबरोबर केसांना सुद्धा लाभकारी आहे.

धुळ आणि प्रदूषणापासून केसांचे रक्षण—-

सूर्यफुलाच्या तेलात अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे ते केसांसाठी आरोग्यदायी असते. यातील व्हिटॅमिन ई हे केसांसाठी प्रभावी काम करते. सूर्यफुलाचे तेल हे केसांवर संरक्षक कवच निर्माण करते. त्यामुळे केसांचे बाहेरील धुळ आणि प्रदूषणापासून होणारे नुकसान टाळले जाते.

कोरड्या केसांसाठी उत्तम—-

सूर्यफुलाचे तेल यामध्ये असे घटक असतात ज्यामुळे केसांचे योग्य पद्धतीने पोषण होते. केसांच्या मुळांना योग्य प्रमाणात पोषण मिळाल्यामुळे केस चमकदार होतात. केसांचा कोरडेपणा यामुळे हळूहळू कमी होण्यास मदत होते. कोरड्या केसांना हे तेल फार गुणकारी आहे.