| |

आला फळांचा राजा आला , मात्र आंब्यांवर ताव मारताना ‘हि’ घ्या काळजी

हॅलो आरोग्य ऑनलाईन । उन्हाळा सुरु झाला कि , फळाचा राजा असलेला आंबा याचा सिझन येतो. उन्हाळ्याच्या दिवसांत आंबा बाजारात विकायला येतो. जानेवारी महिना संपला कि, आंबे बाजारात उपलब्ध असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत तर सगळीकडे बाजारपेठा या आंब्याच्या फळांमुळे भरलेल्या असतात. जिकते तिकडे आंब्याचा सुवास दरवळत असतो. उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्यांपासून थंडगार ज्यूस तयार   करून  आहारात घेतला जातो.

यावर्षी कोरोनाचा प्रसार खूप जास्त प्रमाणात आहे. पण तरीही अनेक ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये आंब्याची विक्री हि मोसम सुरु होण्याअगोदर चालू झाली आहे. कोरोना मुळे आंब्यांची विक्री कमी प्रमाणात होताना दिसत आहे. कारण कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता असते. महाराष्ट्रातील कोंकण , रत्नागिरी , देवगड अश्या भागात आंब्यांचे उत्पन्न जास्त प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्रातील हापूस आंबा खूप प्रसिद्ध आहे. या आंब्यांना बाहेरच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात मागणी आहे.कोकणातील आंबे हि जगप्रसिद्ध आहेत. अनेक लोक जास्त लाभ मिळावा म्हणून चुकीच्या पद्धतीने आंबे पिकवतात.

आंबा

आंबे ज्यावेळी कच्चे आणि हिरव्या रंगाचे असतात. त्या आंब्याला कैरी म्हंटले जाते. त्या कैरीपासून पन्हे, ज्यूस, लोणचे , मुरंबा असे पदार्थ बनवतात. कि ते शरीराला खूप फायदेशीर राहतात. गावाकडच्या भागात अजूनही आंबे पिकवण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करतात. आंबे पिकवण्यासाठी गवताच्या काड्यांचा किंवा बारदान वापरतात. त्याच्यामध्ये कच्चे आंबे टाकले जातात. गवतामुळे आणि बारदानें यामुळे उष्णता वाढते आणि त्यामुळे आंबे लवकर पिकतात. पण अनेक ठिकाणी आंबे चुकीच्या पद्धतीने पिकवले जात आहेत. बाजारात जास्त उत्पन्न मिळावे म्हणून कॅल्शियम कार्बोनेट चा वापर आंबे पिकवण्यासाठी केला जात आहे. हा रासायनिक पदार्थ आपल्या शरीराला फार हानिकारक आहेत.

चुकीच्या पद्धतीने तयार केलेलं आंबे हे बाजारात उपलब्ध आहेत. अनेक ठिकाणी वेळच्या आधी केमिकल चा वापर करून पिकवलेले आंबे विक्रीस येत आहेत. त्यामुळे जरी तुम्ही आंबे खाण्याचे जास्त शौकीन असाल तरी मात्र तुम्हीच बाजारातून आंबे खरेदी करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या सोबत आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालत नाहीत ना, याची काळजी घेतली जावी. कॅल्शियम कार्बोनेट हे अतिशय धोकादायक आहे. त्याचा सतत काही प्रमाणात अंश हा पोटात गेला तर इतर व्याधी होऊ शकतात.कॅल्शियम कार्बोनेट वापरून फळे पिकविण्यावर न्यायालयाने बंदी घातली असून, ह्या रसायनाचा वापर घातक आहे. ही पावडर पांढऱ्या रंगाची असून कर्करोगासारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते. ह्या रसायनाच्या मदतीने पिकविलेली फळे खाल्ल्यानंतर जास्त तहान लागणे, अशक्तपणा येणे, शरीरावर सूज येणे अश्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बाजरातून फळे विकत घेताना काळजी घेणे आवश्यक आहे. आंबे खरेदी करताना विशेष काळजी घेतली पाहिजे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *