| | | | |

निरोगी आरोग्यासाठी लाभदायक काळीमिरीची जादूगिरी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच काळ्या मिरीशी परिचित आहोत. काली मिरी हि सर्व साधारणपणे सर्दी खोकल्यासारख्य आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी वापरले जाणारे प्रभावी औषध आहे. मात्र, त्याचे याहीपेक्षा वेगळे असे अनेक फायदे आहेत. ज्यांच्या सहाय्याने आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे अधिक सोपे जाते. तसे पहाल तर काळ्या मिरीचा सर्वात जास्त वापर खडा मसाला म्हणून स्वयंपाकात केला जातो. पण अनेक शतकांपासून सर्दी-खोकल्यासारख्या आजारांवर प्रभावी औषध म्हणून काळीमिरी वापरली जात आहे. इतकेच नव्हे तर तज्ञांच्या सांगण्यानुसार, काळीमिरीत असलेल्या उच्च अँटि ऑक्सिडेंट्समुळे, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत होते. चला तर जाणून घेऊयात काळीमीरीचे अन्य आरोग्यवर्धक फायदे खालीलप्रमाणे :-

१) अँटी-ऑक्सिडंट्स – मिरीमध्ये पाइपरीन हे महत्वाचे अँटी-ऑक्सिडेंट असते. यामुळे पेशींचे फ्री रॅडिकल्सपासून रक्षण होते. यामुळे विविध प्रकारचे कॅन्सर, हृदयाचे विकार, अकाली वृद्धत्व येणे यांपासून बचाव होतो.

२) पोषक तत्वे – मिरीमुळे शरीरात कॅल्शिअम व सेलेनियम ही पोषकतत्व शोषण्यास मदत होते. इतकेच नव्हेत तर हळदीतील करक्युमिन हा पोषक घटक शरीरात शोषण्यास काळीमिरी मदत करते.

३) मेंदूसाठी फायदेशीर – मिरीतील पाइपरीन मेंदूच्या सुधार कार्यासाठी हातभार लावते. यामुळे अल्झायमर्स व पार्किन्सस या मेंदूसंबंधित आजारात फायदा होतो.

४) तणाव दूर – काळ्या मिरीतील पाइपरीनमध्ये अँटी-डिप्रेससंट गुणधर्म असतात. ज्यामुळे तणाव आणि नैराश्य दूर होण्यास मदत मिळते.

५) रक्तातील साखरेवर नियंत्रण – काळीमीरी रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. परिणामी मधुमेहापासून बचाव होतो.

६) कोलेस्टेरॉल कमी – रक्तातील बॅड कोलेस्टेरॉलमूळे हार्ट अटॅक, पक्षाघात, उच्च रक्तदाब ह्या गंभीर समस्या होतात. परंतु काळीमिरी खाण्यामुळे रक्तातील LDL नामक बॅड कोलेस्टेरॉल कमी होऊन HDL नामक चांगले कोलेस्टेरॉल वाढते.

७) सूज कमी – काळ्या मिरची सूज कमी करणारे अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. यामुळे सांधेदुखी, हृदय विकार, डायबेटीस, कॅन्सर अशा विविध आजारातील सूज कमी होण्यात मदत होते.

८) कॅन्सरपासून बचाव – मिरीतील पाइपरीन अँटि ऑक्सिडेंटमुळे ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर व मलाशयाचा कॅन्सर होण्यापासून आपल्या शरीराचे संरक्षण होते.

९) अन्नपचन – दररोज २ काळीमिरी खाण्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन होण्यासाठी मदत होते. शिवाय प्राचीन आयुर्वेदातही मिरीचे दीपन व पाचन गुणधर्म सांगितले आहेत.

१०) त्वचा रोगावर परिणामकारक – पुटकुळ्या किंवा मुरुमांची समस्या असल्यास त्यावर मिरपूड चोळा. यामुळे कमी वेळात आराम मिळेल. निश्चितच हे लावल्याने त्वचेवर थोडी जळजळ जाणवेल, थोडा त्रास होईल. पण तरीही आपल्याला वेगानं चेहरा मुरूम मुक्त होत असलेला दिसेल.