लाल लाल स्ट्रॉबेरीचे आरोग्यास अनेको फायदे; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। स्ट्राॅबेरी हे एक असे फळ आहे ज्याचे सर्वाधिक उत्पादन थंडीच्या दिवसात येते. या फळाचा सुगंध, त्याचा गडद लाल रंग, रसयुक्त गर अत्यंत आकर्षित करतो. शिवाय या फळाची आंबट गोड चव अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच प्रभावित करत असते. या फळाचा विषेशतः उपयोग ज्युस, आईसक्रीम, मिल्कशेक, चाॅकलेट आणि केक अशा विविध डेसर्टस साठी केला जातो. इतकेच काय तर हे फळ थेट खाणेसुद्धा अनेको लोक पसंत करतात. स्ट्राॅबेरीमध्ये व्हिटामीन सी आणि के सोबतच फाॅलीक अॅसीड, मॅग्नेशियम, मॅगनीज, आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. मुख्य म्हणजे यात नैसर्गिक साखर समाविष्ट असते. त्यामुळे डाइटरी फायबरचा उत्तम स्त्रोत म्हणुन हे फळ ओळखले जाते. शिवाय स्ट्राॅबेरीत फायटोन्यूट्रियंट आणि फ्लोवोनाइडचे प्रमाणही चांगले आढळते. महत्वाचे म्हणजे स्ट्राॅबेरी ताजी असो किंवा स्टोअर केलेली यात नेहमी आकर्षक, स्वास्थ्य लाभदायक गुण असतात. जे आपल्या शरीराकरता मुबलक प्रमाणात पोषण देण्यास सक्षम असतात. चला तर जाणून घेऊयात स्ट्रॉबेरीचे फायदे खालीलप्रमाणे:-
१) फाॅलीक अॅसीडने परिपूर्ण – स्ट्राॅबेरी शरीराला फोलेट पुरवते. जे खादयपदार्थांमधे आढळुन येणा-या फाॅलीक अॅसीडचा एक महत्वपुर्ण भाग आहे. व्हिटामीन B चे प्रमाण शरीरात हवे तेवढे नसेल तर संवहनी रोग, अॅथेरोस्कलेरोसिस आणि पचनतंत्र बिघाड होवु शकते.
२) ताणतणावरवर परिणामकारक – स्ट्राॅबेरीत व्हिटामीन सी अधिक असते. जे तणावपुर्ण स्थितीत रक्तदाबाला कमी करून सामान्य पातळीवर आणण्याची क्षमता ठेवते. यामुळे अगदी हाइपरटेंशन’ची समस्यासुध्दा कमी होते.
३) मेंदुच्या कार्यप्रणालीत सुधार – स्ट्राॅबेरीत आढळुन येणा-या व्हिटामीन सी आणि फायटोन्युट्रियंट मुळे टिश्युची कमतरता आणि न्युरोट्रांसमीटरची कमजोरी दूर होते. यामुळे अनेको आजारांवर मात करता येते. लोडीन नावाचे एक न्युट्रियंट स्ट्राॅबेरीत विपुल प्रमाणात असते. जे मेंदुच्या कार्याला विकसीत करते आणि गती देते. एंथोसायनिनमधे शाॅर्ट टर्म मेमरी लाॅसला विकसीत करण्याची क्षमता असते.
४) अतिरिक्त चरबी कमी करून पचनक्रियेत सुधार – स्ट्राॅबेरीतील फायबर आतडयांना स्वस्थ ठेवते. यातील एंथोसायनिन हे लाल रंगाचे अॅंटीआॅक्सीडंट देखील शरीरातील अतिरीक्त चरबी कमी करते. शिवाय या फळात नाईट्रेट देखील आहे जे शरीरात आॅक्सीजनचे प्रमाण वाढवते. यामुळे शरीरातील रक्तप्रवाहाची गती विकसित होते आणि स्थुलपणा कमी होतो.
५) हाडांचे सक्षमीकरण – स्ट्राॅबेरीत पोटॅशियम मॅग्नीशियम आणि व्हिटामीन के असते. ज्यामुळे शरीरातील हाडांची ताकत वाढते आणि हाड मजबूत होतात.
६) उच्च रक्तदाबावर नियंत्रण – स्ट्रॉबेरीतील पोटॅशियम, वसोडीलेटर, आणि मॅग्नेशियम प्रभावी रूपात उच्चरक्तदाबाच्या समस्येला दुर करतात. त्यामुळे स्ट्राॅबेरीचे सेवन केल्यास शरीरातील रक्तप्रवाहाला वाढ मिळते आणि स्वस्थ आॅक्सीजनचा संचार शरीरात वाढतो. परिणामी उच्च रक्तदाबावर नियंत्रण राहते.
७) ह्नदयाचे संरक्षण – स्ट्रॉबेरीतील फ्लोवोनाईड ह्नदयासंबधीच्या विकारांना कमी करते. त्यासोबतच कोलेस्ट्राॅल कमी करून हायपरटेंशनची समस्या देखील कमी करते. एका संशोधनानुसार, दररोज २-३ स्ट्राॅबेरी खाणे ह्नदयविकाराचे प्रमाण ३२% कमी करतात.