| | |

चुकीच्या आहारामुळे या ३ आजारांचा धोका निश्चित; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। संपूर्ण जगभरातील कित्येक लोक आपल्या आहार आणि जीवनशैलीची योग्य ती काळजी घेतात? असा प्रश्न विचारल्यानंतर आधी आपणच उत्तर दिले पाहिजे आणि याचे उत्तर नाही असेल तर वेळीच सुधारणा केली पाहिजे. कारण आपल्याच कितीतरी सवयी आपल्या आरोग्याची हानी करत असतात. यातील मुख्य कारण चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहारच आहे. जगभरात दररोज कित्येक मृत्यू होत असतात. यातील दर पाचपैकी एक मृत्यू चुकीचा आहार व त्याच्याशी संबंधित आजारांमुळे होतो. पण मग योग्य आहार कोणता? असा प्रश्न पडतो.

तर विज्ञान सांगते की, आहारात फळे आणि पालेभाज्या, कडधान्ये, अंडी आणि मासे असे प्रथिने, क्षार, जीवनसत्व असणारे अन्नपदार्थ आहारात असणे गरजेचे आहे. पण जर आपल्या आहारात यांपैकी काहीही नसून मसालेदार, तेलयुक्त आणि जंक फूडसारखे पदार्थ असतील तर मित्रांनो तुम्ही स्वतःहून वाघाच्या जबड्यात हात घालत आहात हे लक्षात घ्या. कारण तुमचा अयोग्य आहार तुम्ही मोठमोठ्या आजारांना बळी पाडत असतो. आज आपण याचबाबत जाणून घेणार आहोत. प्रामुख्याने खालील ३ आजार निश्चितच तुम्हाला होऊ शकतात त्यामुळे वेळीच आरोग्याकडे लक्ष द्या.

१) हृदयरोग – अनारोग्यकारक आहारामुळे हृदयाची कार्यक्षमता बिघडते. कारण असा आहार हृदयाच्या कार्यप्रणालीवर ताण निर्माण करते. हृदयरोगाचे सर्वात मोठे कारण म्हणजे सोडियम वा मिठाचे जास्त प्रमाण. कारण उच्च सोडियमच्या सेवनाने रक्तदाब (उच्च रक्तदाब) वाढतो. यामुळे रक्तवाहिन्यांचेही नुकसान होते आणि हृदयाची समस्या उद्भवते. त्यामुळे अयोग्य आहार घेत असाल तर सावध व्हा!

२) मधुमेह – आपण खाल्लेल्या अन्नाचे आपल्या शरीरात साखरेत रूपांतर होत असते. त्याचा उपयोग शरीर ऊर्जा म्हणून करते. गोड पदार्थ शरीरात वेगाने शोषले जातात आणि त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वर-खाली होते. त्यात तुमच्या आहारात जर साखरेशी संबंधित कोणतेही पदार्थ जास्त असतील तर ते मधुमेहाचे प्रमुख कारण आहेत हे जाणून घ्या आणि वेळीच ते खाण्यावर आवर घाला.

३) कॅन्सर – प्रथिने, चरबी आणि कर्बोदकांचे योग्य संतुलन निरोगी शरीरासाठी आवश्यक आहे. WCRF (World Cancer Research Fund) च्या रिपोर्टनुसार, चिप्स, बर्गर, चॉकलेट, बिस्किटे इ. उच्च चरबीयुक्त आणि साखरयुक्त पदार्थांच्या सेवनाने शरीरातील चरबी वाढते. यामुळे होणाऱ्या लठ्ठपणामुळे १२ प्रकारचे कर्करोग होतात.

० निरोगी आहारासाठी सूत्र –

– दैनंदिन आहारातील ५०% भाग म्हणजे २ भाग फळे आणि भाज्यांचा असावा. कारण ते शरीराला सर्व आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि पोषक घटक प्रदान करतात.

– आहारातील २५% भाग कर्बोदके असावीत. कारण कर्बोदके शरीराला ग्लुकोज पुरवतात. ते शरीरात ऊर्जा म्हणून काम करते. यामुळे शरीराच्या संचालनासाठी ६०% ऊर्जा प्राप्त करता येते.

– आहारातील उर्वरित २५% भाग प्रथिनयुक्त पदार्थ घेतला पाहिजे.