| | | |

काळ्या मनुक्यात दडलंय सुंदर केसांचे रहस्य; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मनुके द्राक्ष वाळवून तयार केली जातात हे सगळेच जण जाणतात. पण अनेकदा विविध रंगाची द्राक्षे बहुत कित्येकांना प्रश्न पडतो कि आरोग्यासाठी नक्की कोणते मनुके फायदेशीर आहेत. हिरवा, काळा, जांभळा,चॉकलेटी अशा रंगांमध्ये मनुके बाजारात उपलब्ध असतात. कारण मुळात त्यात द्राक्षांच्या विविध प्रकारावरुन मनुक्याचे प्रकार ठरतात. जसे कि, बाजारात सिडलेस द्राक्ष मिळतात त्यामुळे मनुक्याचे सिडलेस प्रकार पाहायला मिळतात. एकंदर काय तर जशी द्राक्षे तसा मनुका.

मनुक्याचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक असते. यात शारीरिक, मानसिक आणि सौंदर्य संबंधित आरोग्यविषयक समस्यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे काळे मनुके निरोगी केस ठेवण्यासाठी अतिशय मदत करतात. कारण काळ्या मनुक्यांमध्ये
– साखर ५९.१९ ग्रॅम
– डाएटरी फायबर ३.७ ग्रॅम
– फॅट ०.४६ ग्रॅम
– प्रोटीन ३.०७ ग्रॅम
– कॉपर
– आर्यन
– मॅग्नेशिअम
– कार्बोहायड्रेट्स
यांसारखे पोषक तत्त्व असणारे घटक समाविष्ट असतात. चला तर मग जाणून घेऊयात काळे मनुके खाण्याने केसांचे आरोग्य कसे राखता येते ते.

  • केसांची वाढ
    जर केसांची वाढ संथ असेल किंवा योग्य पद्धतीने होत नसेल तर कला मनुका जरूर खावा. कारण काळ्या मनुक्यात व्हिटॅमिन बी, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम असते. शिवाय मनुक्याच्या सेवनामुळे रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि केसांची वाढ होण्यास मदत मिळते.
  • मजबूत केस
    केसांच्या वाढीसोबत केसांचा मजबूतपणा देखील तितकाच महत्वाचा आहे आणि यासाठी काळे मनुके म्हणजे अगदी उत्तम पर्याय आहेत. कारण केसांच्या मुळांना मजबूत करण्याचे काम काळ्या मनुक्यातील पोषक घटक करत असतात. त्यामुळे साहजिकच केसगळती थांबते आणि केसांची मूळ मजबूत झाल्यामुळे पुन्हा केसगळतीचा त्रास होत नाही.
  • केसांचा रंग
    आजकाल अनेक लोकांमध्ये फारच कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या फार मोठी आहे. या समस्येसाठी काळा मनुका अत्यंत फायदेशीर आहे. कारण काळ्या मनुक्यांमध्ये केसांच्या रंगासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असते. यामुळे काळ्या मनुक्याचे सेवन केले असता केसांचा कला रंग टिकून राहतो शिवाय वेडेआधी केस पांढरे होत नाहीत.
  • चमकदार व मुलायम केस
    जर तुम्हालाहि चमकदार आणि मुलायम असे केस हवे असतील तर काळे मनुके खायला लगेच सुरुवात करा. कारण काळ्या मनुक्याच्या सेवनामुळे तुमच्या केसांच्या अनेक समस्या वेगाने कमी होतात. परिणामी तुमचे केस चमकदार आणि मुलायम होतात.
  • कोंडामुक्त केस
    केसांची त्वचा कोरडी पडल्याने कोंड्याचा त्रास होतो. अश्यावेळी केसांची त्वचा कोरडी होण्यापासून काळे मनुके संरक्षण करतात. काळे मनुके केसांच्या स्काल्पला आवश्यक ती पोषक तत्त्वे पुरविण्यास सक्षम असल्यामुळे केसातील कोंडा दूर होण्यास मदत होते.