tablet

झोपेच्या गोळ्याचे आपल्या शरीरावर होणारे गंभीर परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेक वेळा दररोजच्या धावपळीत आणि कामाच्या टेन्शन मुळे आपल्याला हवी तेवढी झोप पूर्ण होत नाही अश्या वेळी अनेक वेळा अनेक लोक हे झोपेच्या गोळ्या घेऊन आराम करतात. अश्या वेळी आपल्याला झोप चांगली होते . पण त्यानंतर आपल्या शरीरावर त्या गोळ्यांचा परिणाम हा जाणवायला सुरुवात होते. झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या खाणे शरीराच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. त्यामुळे अश्या वेगळ्या झोपेच्या गोळ्या खाताना विचार करून खाल्या जाव्यात .

झोपेच्या सवयी आणि झोपेच्या गोळ्या खाण्याचे प्रमाण हे जास्त करून वयोवृद्ध आणि तरुण यांच्यामध्ये जास्त आढळते. सतत असलेले टेन्शन किंवा आपल्या दररोज च्या खाण्यात जर जास्त प्रमाणत औषधी गोळ्या असतील तर त्यावेळी त्याचा जोपर्यंत परिणाम आहे तोपर्यंत झोप होते . पण त्यानंतर झोप होत नाही अश्या वेळेला झोपण्याच्या अगोदर काही वेळ झोपेच्या गोळ्या या खाव्या लागतात. हा त्रास साधारण महिलांच्या आयुष्यात हा  खूप  असतो. जर आपल्या घरात काही वेळा आजरांचा इतिहास असेल तर त्यावेळी सुद्धा आपल्याला गोळ्याची गरज लागते.

आपल्या दररोजच्या दिनक्रमात जर झोपेच्या  गोळ्यांचे प्रमाण हे जास्त असेल तर त्यावेळी अनेक शारीरिक समस्या या जास्त प्रमाणात निर्माण होतात. अश्या वेळी आपल्या शरीराला थकवा जाणवायला सुरुवात होते , सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींबाबत नैराश्य यायला सुरुवात असते. थकवा हा जास्त जाणवतो. अश्या वेळी प्रचंड प्रमाणत डोकेदुखीचा त्रास हा जास्त वाढतो. कोणतेही काम करण्याची इच्छा निर्माण होत नाही. अश्या वेळी व्यायाम  आणि सकाळी  फिरायला गेले पाहिजे.  व्यायाम केल्याने  आपले मानसिक संतुलन हे व्यवस्थित राहण्यास मदत करते .  त्यामुळे आपले शरीर थकले जाते. आणि लगेच झोप येते .