| | |

जायफळाचे विशेष गुणधर्म घेतील आरोग्याची काळजी; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जायफळाचा सुगंध आणि विशिष्ट चव कोणत्याही गोडाचा पदार्थ अधिक चविष्ट करते. परंतु जायफळाचा तेवढाच उपयोग होत नाही. तर जायफळाचा आपल्या आरोग्याशी अतिशय लाभ आहे. होय.. कारण, जायफळात कफ, वात, घामाचा दुर्गंध, जंत, खोकला, श्वास घेण्यास होणारा त्रास, हृदयरोग अशा व्याधींपासून मुक्ती देणारे गुणधर्म आहेत. शिवाय जायफळ वेदनाशामक, वातशामक आणि कृमीनाशक आहे. त्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत करण्यासाठी जायफळाचा उपयोग होतो. तसेच जायफळाच्या तेलात आणि जायफळ चूर्णातही अनेको औषधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे आपले आरोग्य सुरक्षित राहते. चला तर जाणून घेऊयात जायफळाचे असे कोणते फायदे आहेत जे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम आहेत. खालीलप्रमाणे:-

१) डागरहीत त्वचा – दगडावर जायफळ पाण्याबरोबर घासावे आणि त्याचा लेप तयार करावा. हा लेप डोळ्यांच्या पापण्यावर आणि डागाळलेल्या भागावर लावल्याने दृष्टी तेज होते. तसेच चेहऱ्यावरील डागदेखील नाहीसे होतात.

२) संधिवातावर प्रभावी – संधिवातामुळे शरीराला असह्य वेदना सहन कराव्या लागतात. या वेदनांवर उपाय म्हणून जायफळ आणि सरसोचे तेल एकत्र करून मालिश करावी. यामुळे अगदी काहीच क्षणात आराम मिळतो. या मिश्रणाने मालिश केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि घामाच्या स्वरूपात रोग नाहीसा होतो.

३) पोटदुखीपासून सुटका – अपचनाचा त्रास किंवा मग गॅसेसची समस्या उदभवल्यामुळे जर पोटात दुखत असेल तर जायफळाच्या तेलाचे साधारण २ ते ३ थेंब साखरेत मिसळून खावेत. यामुळे अशी पोटदुखी काही क्षणात थांबते.

४) दातदुखीवर उपायकारक – दातांची वेदना अशी असते कि याचा परिणाम थेट अन्नग्रहणावर होतो. अश्या दंत वेदना दूर करण्यासाठीदेखील जायफळाचा उपयोग होतो. यासाठी एक छोटा जायफळाचा तुकडा ज्या दातांमध्ये वेदना आहेत त्या दाताखाली ठेवा.

५) सर्दी आणि डोकेदुखीपासून मुक्ती – सर्दी झाली कि डोकेदुखी आपोआपच येते आणि यासाठी जायफळ १००% प्रभावी आहे. या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी केवळ जायफळाची पावडर गरम पाण्यात एकत्र करून त्याचा तयार लेप नाकाच्या आजूबाजूला आणि कपाळावर लावा. याचा लगेच अगदी काहीच वेळात प्रभाव दिसून येतो.

६) लहान बाळांसाठी फायदेशीर – लहान बाळाला कफ झाला किंवा रात्री झोप लागत नसेल तर जायफळाचा लेप उपयोगी पडतो. तसेच बाळाला वरचे दूध पचत नसेल तर दुधामध्ये थोडे पाणी मिसळून त्यात जायफळ घालून उकळावे. हे दूध कोमट झाल्यावर हळूहळू बाळाला पाजावे. असे केल्याने बाळाला दूध पचते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *