|

वर्षानुवर्षे ‘या’ पदार्थांची तरी चव बदलणार नाही; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण कोणतीही वस्तू खरेदी करतेवेळी नेहमी त्याची एक्सपायरी डेट आधी पाहतो आणि मगच विकत घेतो. कारण एक्सपायरी डेट उलटलेल्या पदार्थांचे सेवन विविध आजारांना आमंत्रण देणारे असतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? आपल्या दैनंदिन वापरातील अनेक गोष्टी अश्या आहेत ज्यांना एक्सपायरीच नसते. इतकंच काय तर त्याची चवदेखील बदलत नाही. आम्ही तुम्हाला तुमच्याच वापरातल्या अश्या पदार्थांची नव्याने ओळख करून देणार आहोत जे तुम्ही वर्षानुवर्षे साठवून अगदी खुशाल वापरू शकता.

१) साधा तांदुळ – आपण तांदळाचा वापर आहारासाठी दररोज करतो. कधी साधी खिचडी, जिरा भात, बिर्यानी, पुलाव आणि अगदी गोड खीर बनवण्यासाठी आपण साधा पांढरा तांदूळ वापरत असतो. हे तांदुळ जर हवाबंद डब्यात साठवले तर ते दीर्घ काळापर्यंत टिकतात आणि त्याची चवदेखील बदलत नाही. मात्र त्याला हवा लागली तर ते लगेच काहीच दिवसात खराब होतात.

२) डाळी – आपण आपल्या आहारात प्रामुख्यानं विविध डाळींचा समावेश करत असतो. यात मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, फुटण्याची डाळ,चणा डाळ अश्या अनेक डाळींचा समावेश असतो. या डाळींना वेळोवेळी ऊन दाखवले असता या दाली तुम्ही वर्षानुवर्षे साठवून हव्या तेव्हा वापरू शकता.

३) साखर – साखर असा पदार्थ आहे ज्याचा दररोज सकाळी किमान चहासाठी तरी वापर होतोच होतो. जर हि साखर ओल्या चमच्याचा वापर न करता हवाबंद डब्यात साठवली तर ती वर्षानुवर्ष तशीच राहू शकते. शिवाय तिच्या गोडीत किंचितही बदल होणार नाही.

४) मिठ – मिठाशिवाय चव ती काय..? अश्या मिठाचा वापर भाज्या, डाळी, कोशिंबिरी आणि जिभेच्या चवीला लागणाऱ्या प्रत्येक पदार्थात केला जातो. शिवाय मिठाचा वापर खाद्यपदार्थ वर्षानुवर्ष टिकवण्यासाठीही केला जातो. तसेच मिठ ओल्या हाताचा त्यात वापर न करता घट्ट डब्यात ठेवल्यास ते वर्षानुवर्ष खराब होत नाही आणि त्याची चवही बदलत नाही.

५) मध – मध कधीच शिळे होत नाही. मात्र यासाठी मध शुद्ध असायला हवे. बराच काळ साठवलेले मध घट्ट झाले असल्यास त्या सिलबंद कंटेनरला गरम पाण्यामध्ये किमान १० ते १५ मिनिटांसाठी ठेवा ज्यामुळे ते वापरायोग्य होईल.

६) व्हिनेगर – व्हिनेगरला एक्स्पायरी नसते. मिठाप्रमाणे त्याचा वापर खाद्य पदार्थांच्या साठवणीसाठी करतात. मुख्य म्हणजे फ्रिजशिवाय तुम्ही व्हिनेगर वर्षानुवर्ष साठवू शकता.

७) कॉर्नस्टार्च – कॉर्नस्टार्चचा उपयोग कोटही ग्रेव्हीचा पदार्थ घट्ट करण्यासाठी किंवा चायनीस पदार्थांचे सॉस किंवा सूप बनवण्यासाठी केला जातो. हवाबंद डब्यात ठेवल्यास कॉर्नस्टार्चदेखील बराच काळ साठवता येते.

८) सोया सॉस – चायनीज रेस्टॉरंट आणि गाड्यांवर सोया सॉसचा वापर अत्याधिक प्रमाणात केला जातो. अश्या सोया सॉसची बॉटल न उघडता तशीच ठेवली तर त्यातील सॉस अनेक वर्ष चव न बदलता तसाच राहतो. फ्रिजमध्येही हा सॉस किमान २ ते ३ वर्ष आरामात टिकतो.