| | | |

काळ्या लसणीचा प्रकार उग्र नाही आरोग्यदायी आहे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पांढरी लसूण कुणाला माहीत नाही. आपण सारेच जाणतो कि दैनंदिन जीवनात आपण जो आहार घेतो त्यात लसणीचा समावेश असतो. कारण भारतीय आहारपद्धतीत कितीतरी असे पदार्थ आहेत ज्यात लसणाची फोडणी म्हणजे आहाराचा मूळ स्वाद मानला जातो. हा काही लोक असेही आहेत ज्यांच्या खाण्यापिण्यात लसूण वर्ज्य आहे. पण काही लोकांना भाजीत लसणाची खमंग फोडणी नसेल तर जेवणही जात नाही. कारण खरोखरच लसणामुळे पदार्थाला येणारा स्वाद छान असतो. पण काहींना लसणीचा स्वाद काय अगदी वासदेखील आवडत नाही. अश्यांसाठी काळी लसूण हा अगदी उत्तम पर्याय आहे.

अहो सांगताय तुम्ही कधी काळ्या लसूणविषयी ऐकलं नाही? काही हरकत नाही. कारण आपण लसणीच्या याच प्रकाराविषयी जाणून घेणार आहोत. काळ्या लसणाचा वास पांढऱ्या लसणासारखा उग्र नसतो. पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप आहेत. खरंतर काळा लसूण हा पांढऱ्या लसणीचाच एक प्रकार आहे. जो फर्मेंटेशन प्रक्रियेतून तयार केला जातो. ताजा पांढरा लसूण ठराविक तापमानावर फर्मेंट केला जातो. ज्यामुळे त्याची चव कमी तिखट होते आणि तो मऊ होतो. पण यामुळे त्यातील पोषक तत्त्व अजिबात कमी होत नाहीत किंवा तो लसूण खराबही होत नाही. प्राचीन काळापासून अनेक औषधांमध्ये आणि उपचारपद्धतींमध्ये काळ्या लसणाचा वापर केला जातो. त्यामुळेच अनेक आशियाई देशांमध्ये काळ्या लसूणाचा वापर सर्रास केला जातो. चला तर जाणून घेऊया काळ्या लसणीविषयी अधिक माहिती:-

० फर्मेंटेशनमूळे काळ्या लसणातील पौष्टीक तत्त्व वाढतात. फर्मेंटेशनमूळे काळ्या लसणामध्ये युनिक अँटी-ऑक्सीडंट्सचे गुण आढळतात. ज्यामुळे हा लसूण अँटी-इन्फ्लेमेटरी म्हणजेच जळजळ नाशक ठरतो. तसंच यात पॉलिफेनॉल, फ्लेवनॉईड आणि अल्कलॉईड पोषक तत्त्व आढळतात.

० पांढऱ्या लसणात आढळणारे आरोग्यदायी गुणयुक्त एलिसीन हे पोषक तत्त्व काळ्या लसणातही असतात. हे रक्ताभिसरण वाढवतात.

० काळ्या लसणीचे सेवन केल्यास कॉलेस्ट्रॉल आणि हृदयसंबंधित रोगही कमी होतात.

० काळ्या लसणीच्या आढळणाऱ्या अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणांमुळे शरीरातील पेशींचं संतुलन राहत आणि रोग प्रतिकारक क्षमताही वाढते.

० या लसणाचं सेवन केल्यास रक्तातील साखरही संतुलित राहते. याचा फायदा मधुमेहींना होतो.

– काळ्या लसूणाचं सेवन या रोगांवर गुणकारी

० काळ्या लसूणाचं सेवन केल्याने अनेक प्रकारच्या कॅन्सरला आळा बसतो. प्रामुख्याने ब्लड कॅन्सर, पोटाचा कॅन्सर आणि कोलन कॅन्सरच्या इलाजात हा लसूण गुणकारी ठरतो.

० काळा लसूण एलर्जी कमी करतो. मेटबॉलीजम वाढवतो आणि लिव्हरला कोणत्याही अपायापासून वाचवतो.

० काळी लसूण मेंदूला आरोग्यदायी ठेवण्यातही मदत करतो.

– कसा वापरालं काळा लसूण ?
० दैनंदिन जेवणासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलात काळा लसूण घालून ठेवल्यास तो वापरणं सोपं जाईल. तसंच त्याचे सर्व पौष्टीक गुणही जेवणात उतरतील.

– अत्यंत महत्वाचे
तुम्हाला काही त्रास असल्यास किंवा एखादी ट्रीटमेंट सुरू असल्यास याचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या