| |

ॲल्युमिनियम फॉईल्सचा वापर आरोग्याच्या दृष्टीने घातक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण पाहिले असाल आजकाल अनेक हॉटेल आणि खाऊच्या गाड्यांवर अन्न पदार्थ बांधून देण्यासाठी सिल्वर रंगाचा अल्युमिनियम फॉईल वापरला जातो. या ॲल्युमिनियमपासून तयार केलेल्या चंदेरी रंगाच्या कागदाचा अन्नपदार्थ शिजवताना उपयोग करणे वा अन्नपदार्थ त्यामध्ये बांधून देणे हे याआधी केवळ पाश्च्यात्य संस्कृतीवर्धक इंडस्ट्रीमध्ये होते. पण आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकून उच्च मध्यम वर्ग, पुढे मध्यम आणि कनिष्ठ वर्गातले लोकसुद्धा या ॲल्युमिनियम फॉईल्सचा दैनंदिन उपयोग करु लागले आहेत. सकाळी गडबडीचा वेळी दाब भरताना दुपारी डब्यातले जेवण गरम राहावे म्हणून ॲल्युमिनियमच्या चकचकीत-चंदेरी वेष्टनामध्ये बांधून देण्याची एक वेगळीच पद्धती प्रचलित झाली आहे. खरतर हि एक दिखाव्याची पद्धती आहे कारण याच आरोग्यासाठी फायदा काहीच नाही. उलट यामुळे आरोग्याला धोका संभवतो, हे समजून घेणे आवश्यक आहे.

याचे कारण असे कि, ॲल्युमिनियमच्या संपर्कात येणार्‍या अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे कॅन्सर, दमा होतो. शिवाय हाडांवर विपरित परिणाम होऊन हाडे कमजोर होतात आणि चेतासंस्थेवर याचा विपरित परिणाम झाल्यामुळे स्मृतिभ्रंश, मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड, विकृती अश्या समस्या संभवतात. मेंदुमधील चेताकोषांच्या वाढीमध्ये व कार्यामध्ये ॲल्युमिनियमच्या कणांमुळे अडथळा येतो असे एका संशोधनातून समोर आले आहे. शिवाय हाडांना सुदृढ ठेवणार्‍या कॅल्शियमच्या कणांना हाडांपर्यंत पोहोचण्यात ॲल्युमिनियमचे कण अडथळा आणतात. ज्यामुळे रक्तामध्ये आवश्यकतेपेक्षा कॅल्शियम आणि हाडांमध्ये मात्र कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. परिणामी हाडे कमजोर होतात आणि इतर त्रास ओढवले जातात.

१) अधिक तापमानामध्ये ॲल्युमिनियम अन्नामध्ये झिरपण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे याचा वापर टाळणे योग्य आहे.

२) गरम अन्नपदार्थ ॲल्युमिनियम फॉईलमध्ये बांधून दिल्यामुळे वाफेचे पाण्यातील रूपांतर सूक्ष स्वरूपात होते आणि यामुळे अन्न पदार्थांमधील सत्व नाहीशी होतात.

३) प्रामुख्याने कोणतेही मसाले, सॉस, टॉमेटॉ केचप, आंबट फळांचे रस, वा आंबट पदार्थ शिजवताना ॲल्युमिनियम फॉईल मुळीच वापरु नये. अन्यथा पदार्थांचे सेवन शरीराच्या आंतरक्रियांना हानी पोहचवू शकते.

४) कोणत्याही रस्सायुक्त भाज्या, सांबार, तळलेले पदार्थ, लोणचं, पापड असे वा अन्य कोणतेही तेल तूपयुक्त अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी फॉइल्स वापरू नये.

५) अम्लीय(ॲसिडीक) पदार्थ ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून देण्याची चूक कधीही करु नये. यामुळे पदार्थांमधील ऍसिड अतितीव्र प्रमाणात प्रभाव करते.

६) मायक्रोवेव्ह, ओव्हनमध्ये अन्नपदार्थ शिजवण्यासाटःई ॲल्युमिनियम फॉईल्स वापरू नये. त्यासाठी अधिक जाडीच्या वेगळ्या शीट्स वापरण्याचा सल्ला दिला जातो. कारण अधिक तापमानामध्ये ॲल्युमिनियम झिरपण्याचा धोका नाकारता येत नाही.