| | |

सैंधव मिठाच्या वापराने होतील ‘हे’ विलक्षण फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन : जेवणात मिठाचा वापर अधिक करणे शरीरासाठी नुकसानदायक असते. अनेक आजारांचे कारण ठरु शकते. मात्र आयुर्वेदात सैंधव मीठाचे अनेक फायदे सांगितलेत. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात. चिमूटभर मीठ (salt) खाद्यपदार्थांची चव वाढवतं. मात्र सामान्य मिठापेक्षा सैंधव मीठ (rock salt) उत्तम आहे. पण फक्त उपवासाच्या पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. सैंधव मिठाचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. सैंधव मीठामध्ये सामान्य मिठापेक्षा जास्त खनिजे असतात, जी बऱ्याच प्रमाणात आपल्याला आहारातून मिळत नाहीत. ही खनिजं अनेक शारीरिक कार्यांसाठी फायदेशीर असतात.  सैंधव मीठ सर्वोत्कृष्ट मानलं जातं. म्हणून आयुर्वेदात सैंधव मिठाचा वापर करण्यास सांगितलं आहे. हे मीठ पंजाबच्या सिंध प्रदेशात आढळतं म्हणून त्याला सिंधूज असंही म्हणतात.

सैंधव मीठ साधारणपणे व्रत आणि सणांच्या वेळी वापरले जाते, कारण ते पांढरं मीठ म्हणजेच समुद्राच्या मीठापेक्षा पवित्र मानले जाते. आज आम्ही तुम्हाला मीठाच्या पाण्याचे शरीराला कसे फायदे होतात. याबबत सांगणार आहोत. सैंधव मीठ हिमालयीन मीठ म्हणून देखील ओळखले जाते. या मीठाच्या हलक्या गुलाबी रंगात असे बरेच गुण आढळतात, जे सामान्य मिठापेक्षा अधिक परिणामकारक ठरतात. हिमालयीन मीठाच्या पाण्यात पाय भिजवून आपण अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. या मिठामध्ये झिंक, लोह, मँगनीज, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम ही खनिजं असल्यामुळे हे आरोग्याला अतिशय हितकारक मानलं जातं.

पाहा काय आहेत याचे फायदे

 • सैंधव मीठामुळे हाय ब्लडप्रेशर कंट्रोल कऱण्यास मदत होते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.
 • तणाव कमी करण्यासाठी सैंधव मीठाचे सेवन फायदेशीर ठरते. सैंधव मीठ सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सचे बॅलन्स राखण्याचे काम करते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
 • अंगदुखी कमी करण्यासही सैंधव मिठाचा वापर होतो.
 • सायनसचा त्रास असलेल्यांनी सैंधव मीठाचे सेवन करणे गरजेचे असते. मुतखड्याचा त्रास असल्यास सैंधव मीठ आणि लिंबू पाण्यात मिक्स करुन प्यायल्यास काही दिवसांत फरक पडतो.
 • अस्थमा, डायबेटीज आणि आर्थराइटिसच्या रुग्णांनी नियमितपणे सैंधव मिठाचे सेवन करावे.
 • सैंधव मीठ त्वचेसाठी अतिशय फायद्याचं आहे. मृत त्वचा या मिठानं निघून जाते. त्वचा पेशी मजबूत होऊन त्वचा तजेलदारदेखील दिसते.
 • काही आजारपणामुळे, विकारांमुळे नखांच्या खाली जे पिवळसर डाग पडलेले असतात, ते काढण्यासाठीदेखील सैंधव मिठाचा उपयोग होतो.
 • केसांसाठी कंडिशनर म्हणून सैंधव मिठाचा वापर शाम्पू सोबत करता येतो. केस गळती, केसांचं तुटणं कमी होतं. सैंधव मिठाच्या पाण्यानं गुळण्या केल्यानं टॉन्सिल्सवर आराम पडतो.
 • श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, सर्दी, डोकेदुखी, खोकला वगैरे लहान-मोठय़ा शारीरिक समस्यांवर सैंधव मीठ अतिशय गुणकारी आहे.
 • ताणतणाव हल्ली फार सर्वसामान्य आजार झाला आहे. कारण अगदी क्षुल्लक असतं मात्र त्यातून अनेकदा चिडचिड, अस्वस्थता, डिप्रेशन, भूक न लागणे असे आजार डोकं वर काढतात. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सैंधव मिठाचं सेवन शरीर आणि मनाला स्वस्थता देते. शांत होण्यास मदत करते.
 • पोटाच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या पाण्याची वाफ श्वसनसंस्थेच्या लहान-मोठय़ा कुरबुरींसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. सैंधव मीठ संधिवातावर, काही कीटक चावल्यावर जखम बरी करण्यासाठी देखील वापरलं जातं.
 • या मिठाच्या सेवनानं चरबी कमी होते. या मिठातल्या खनिज तत्त्व इन्सुलिनला रिअँक्टिव्ह असल्यानं साखर खाण्याची किंवा गोड खाण्याची इच्छा कमी होते. हे मीठ वजन वाढीवर नियंत्रण ठेवायलाही मदत होते.
 • रक्तदाब स्थिर ठेवणं, चयापचय क्रिया नियंत्रित करणं, वायुसरणावर नियंत्रण आणि भूक वाढ यासाठीही या मिठाचा उत्तम उपयोग होऊ शकतो.
 • गरम पाण्यात हे मीठ टाकून अंघोळ केल्यासही ताण कमी होतो आणि ताजतवानं वाटतं.
 • चांगल्या पचनक्रियेसाठी: सैंधव मीठ पचन वाढवण्यास तसंच भूक कमी करण्यास मदत करतं. पोटदुखीपासून मुक्त करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. त्याच्या वापरामुळे पोटात आम्लयुक्त पदार्थांची निर्मिती कमी होते. ज्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या टाळता येते. आयुर्वेदानुसार ताज्या पुदीन्याच्या पानांसह लस्सीत सैंधव मीठ मिसळून पिणं फायद्याचं आहे. हे पोटातील जंत नष्ट करण्यात देखील उपयुक्त आहे. सैंधव मीठ लिंबाच्या रसातून प्यायल्याने पोटातल्या जंतांपासून मुक्तता मिळते.
 • चांगल्या चयापचयास प्रोत्साहित करते: चयापचय ही एक प्रक्रिया आहे जी अन्नाला ऊर्जेत बदलते. सैंधव मीठ शरीरातली चयापचय शक्ती वाढवण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. सैंधव मीठ शरीरातील पाण्याचे शोषण सुधारण्यास देखील मदत करू शकतं. शरीरातील खनिज आणि पोषक द्रव्यांना सहज शोषून घेतं.
 • स्नायूंना मजबुती:स्नायूंसाठी पोटॅशियम आवश्यक आहे. सैंधव मिठात पोटॅशियमशिवाय इतर घटकही असतात ज्यामुळे शरीराला मजबुती मिळते.  स्नायूंच्या वेदना टाळण्यास मदत होते.
 • घशाच्या समस्यांपासून आराम: घशात वेदना किंवा सूज येणं, कोरडा खोकला किंवा टॉन्सिल्स असल्यास कोमट पाण्यात सैंधव मीठ टाकून गुळण्या करा या समस्या दूर होतील.
 • हिरड्यांसाठी लाभदायक: दात आणि हिरड्यांसाठी सैंधव मीठ लाभदायक आहे. याने हिरड्यांना मालिश करणं फायदेशीर आहे. यासाठी 1 चमचा सैंधव मीठ, कडुलिंबाची पूड आणि त्रिफळा चूर्ण याचं मिश्रण तयार करा. पाण्यत चिमूटभर हे मिश्रण घालून त्याच्या गुळण्या करा.

वातावरणातील प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता या मिठात आहे. गाड्या, बसेसच्या धुराने होणारे वातावरणातले प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता या मिठात आहे. निसर्गाचा तोल सांभाळण्याचं कामही मीठ करतं.