WHO
| |

जागतिक आरोग्य संघटनेने दिले ‘ओमिक्रॉन’पासून बचावाचे उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाच्या नव्या विषाणूने कहर केला आहे. यामुळे पुन्हा एकदा जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आधीच्या कोणत्याही व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याची नोंद करण्यात आली आहे. एकीकडे कोरोनाचा वाढत प्रसार कुठेतरी थांबताना दिसत असताना विविध देशांमध्ये कोरोनाच्या केसेस कमी झाल्याचे निदर्शनास येत होते. यानंतर आता नव्या विषाणूने डोकं वर काढल्यामुळे पुन्हा एकदा लोकांसमोर जगावे का मरावे अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा हा नवीन विषाणू सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला. यानंतर तो अधिक वेगाने पसरत अन्य देशांना गिळंकृत करू पाहत आहे. त्याचे उत्परिवर्तन देखील ३०पेक्षा जास्त वेळा झाले आहे. या प्रकाराला वैज्ञानिकांनी B.1.1529 असे नाव दिले आहे. तर WHO ने ओमिक्रॉन ( ‘Omicron‘ ) असे नाव दिले आहे.

नव्या विषाणूबाबत एकंदर माहिती जाणून घेतल्यानंतर अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येत असल्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेने लोकांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने लोकांना काही मोलाचे सल्ले देत ओमिक्रॉन पासून आपला बचाव कसा करावा ? हे सांगितले आहे. चला तर जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-

० सर्वप्रथम आपण ओमिक्रॉन’ विषाणूची लक्षणे जाणून घेऊ.
– शारीरिक थकवा,
– स्नायू दुखणे,
– घसा खवखवणे
– कोरडा खोकला
– शरीराचे तापमान किंचित वाढणे.

० ओमिक्रॉन’पासून सुरक्षित कसे रहालं?
– ओमिक्रॉनची प्रकरणे आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात आढळली असली तरीही इतर सर्व देशांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. म्हणून यावर आरोग्य विभाग आणि प्रशासनाने सावधगिरीचा उपाय म्हणून उपाययोजना सुरु केली आहे. याबाबत भारतातही सरकार अलर्ट आहे. अशा परिस्थितीत हा विषाणू टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO’ने काही सल्लात्मक उपाय सुचविले आहेत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) कोव्हीड- १९ या विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी एकमेकांपासून किमान १ मीटर अंतर राखणे जरुरी आहे.

२) नेहमी घराबाहेर पडताना नाक आणि तोंड पूर्ण आणि व्यवस्थित झाकेल असा योग्य मास्क घाला.

३) आपल्या घराच्या खिडक्या उघड्या ठेवा. शिवाय ऑफिसमध्ये व्हेटिलेशन चांगले ठेवा.

४) जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे प्रामुख्याने टाळा.

५) आपले हात स्वच्छ धुत राहा.

६) शिंकताना वा खोकताना रुमाल/ टिश्यू यांचा वापर करा.

७) कोरोना प्रतिबंधात्मक लस अवश्य घ्या.