| |

अमृतासमान गोड आंबा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे आणि तोटे

हॅलो आरोग्य ऑनलाईन : उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो. क्वचितच एखादा मनुष्य प्राणी असेल कि त्याला आंबा आवडत नसेल, नाहीतर तोंड, हात आणि पोट भरेपर्यंत आंबे खाणाऱ्यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. हापूस, तोतापूरी, पायरी, बदामी अशा विविध प्रकारातील आंबे चवीला जितके चांगले असतात तितकेच आरोग्यालाही पौष्टिक असतात. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत (Advantages and disadvantages of eating mango).

आंबे खाण्याचे फायदे:

 • आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे.
 • आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते.
 • आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.
 • फिजिशियनच्यामते, एक सर्वसाधारण आकाराचा आंबा हा बटर किंवा बदामांपेक्षा अधिक पौष्टिक आहे. आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
 • ‘व्हिटामिन बी6’ मुळे रक्तातील ‘होमोसेस्टीना’चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो.
 • आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते.
 • आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.
 • आंब्याला लवकर पिकवण्यासाठी त्यात अनेकदा कॅल्शियम कार्बाइटचा मारा केला जातो. या केमिकलमुळे शरीराला मोठा धोका असतो. आंबा खाण्याआधी तो धुवून स्वच्छ केला जातो पण केवळ पाण्याने धुण्यामुळे त्यावरील केमिकल पूर्णत: नष्ट होत नाही

आंबे खाण्याचे तोटे

 • आंब्यात जवळपास 150 कॅलरीज असतात. जास्त कॅलरी खाल्ल्यास वजन वाढू शकते. म्हणून आंबे खाल्ल्यानंतर दुसरे काही खाऊ नये. असे केले तर तुमचे वजन वाढणार नाही.
 • ज्या लोकांना संधिवात आहे अशा लोकांनी आंब्याचं सेवन कमी प्रमाणात करावं. कच्ची कैरी किंवा आंब्याच्या अतिसेवनाने संधिवात आजार वाढू शकतो.
 • आंब्यात मोठ्या प्रमाणात साखर असते. नैसर्गिक साखर शरीरासाठी, आरोग्यासाठी चांगली असते. पण आंब्याचं अधिक सेवन केल्याने ब्लड शुगरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आंब्याचं सेवन नियंत्रणात करावं.
 • आंब्याला लवकर पिकवण्यासाठी त्यात अनेकदा कॅल्शियम कार्बाइटचा मारा केला जातो. या केमिकलमुळे शरीराला मोठा धोका असतो. आंबा खाण्याआधी तो धुवून स्वच्छ केला जातो पण केवळ पाण्याने धुण्यामुळे त्यावरील केमिकल पूर्णत: नष्ट होत नाही.
 • आंबा हे गरम फळ आहे. त्यामुळे त्याच्या अधिक सेवनाने चेहऱ्यावर किंवा शरीरावरही मुरुम, पुरळ येऊ शकतात.

‘अति तेथे माती’ या न्यायाने कोणतीही गोष्ट घातकच असते. म्हणूनच थोडक्यात गोडी अश्या पद्धतीने जर आंबे खाल्ले तर फायदेच फायदे आहेत.