|

प्रतिबंधात्मक लस नाहीचं असेही रोग अस्तित्वात, ज्यांनी केलाय अनेकांचा घात; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच जाणतो संपूर्ण जगभरात कोरोना नामक विषाणूने गेली दोन वर्षे अक्षरशः कहर माजवला होता. यानंतर सध्या राज्यात त्याच्या नव्या व्हेरियंटची चर्चा आहे. आतापर्यंत वर्षभरात कोरोनाने अनेकांचे प्रियजन हिरावून घेतले आहेत. कित्येक घराणी पोरकी झाली तर कित्येकांचा संसार उध्वस्त झाला. एक अशी भीषण परिस्थिती संपूर्ण जगाने पहिली जिची कुणी अपेक्षाही केली नव्हती. अशा परिस्थितीत आशेचा किरण यावा अशी कोरोनावर भारत बायोटेकच्या माध्यमातून लस तयार करण्यात आली आणि संपूर्ण जगभरात लसीकरणाची मोहीम जोरात सुरु झाली.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रसारासह त्याच्या लसीचीदेखील मोठी चर्चा सुरू झाली. जवळपास दोन वर्षांपूर्वी कोरोनाची लस तयार झाली आणि आता जगातील अनेक देशांमध्ये करोडो लोकांना हि लस देण्यात आली आहे. कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी हि लस इतक्या शक्य तितक्या लवकर तयार केली गेली आणि हि उपाययोजना केल्यानंतर जगभरातील कोरोनाच्या प्रसारावर रोख बसला. पण मित्रांनो आजही जगात असे काही रोग आहेत ज्यांचा संसर्ग होतो आणि कित्येक लोक मृत्युमुखी पडतात. याचे कारण म्हणजे आजतागायत या रोगांवर कोणतीही प्रतिबंधात्मक लास तयार करण्यात आलेली नाही. हे आजार कोणते ते जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-

१) एचआयव्ही एड्स विषाणू (HIV – Human Immunodeficiency Virus Infection)
– एचआयव्ही (HIV) हा एक अतिशय धोकादायक आजार आहे. या आजारावर अद्याप कोणताही भक्कम असा इलाज नाही. शास्त्रज्ञांना साधारण ३ दशकांपूर्वी म्हणजेच ३० वर्षांपूर्वी या आजाराबद्दल सखोल अभ्यास केल्यानंतर हि माहिती मिळाली. (WHO – World Health Organization) जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, सुमारे ३२ दशलक्ष लोकांचा मृत्यू हा HIV एड्स या विषाणूच्या संसर्गामुळे झाला आहे.

तर नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO National AIDS Control Organisation)च्या अंदाजानुसार भारतात २.१४ दशलक्ष लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यूचा दर प्रत्येक वर्षी बदलताना दिसतोय आणि मुख्य म्हणजे तो वाढतोय हि बाब गंभीर आहे. हा आजार गेल्या अनेक शतकांपासून लोकांचा जीव घेतोय मात्र अनेक प्रयत्नांनंतरही आजपर्यंत या आजारावर कोणतेही औषध तयार झालेले नाही. म्हणून हे टाळण्यासाठी वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जातो.
० एचआयव्ही संसर्गाचे मुख्य कारण लैंगिक संबंध मानले जाते.

२) एव्हियन इन्फ्लूएन्झा (Bird flu, H5N1, Avian Influenza)
– तज्ञांनी सादर केलेलया अहवालानुसार, एव्हियन इन्फ्लूएन्झा (बर्ड फ्लू)चा विषाणू हा प्रथम १९९७ साली सापडला होता. या आजाराचे हे पहिले प्रकरण असून त्याची नोंद हाँगकाँगमधून केली गेली होती. या आजाराचे मुख्य कारण म्हणजे H5N1 हा विषाणू. मुख्य म्हणजे हा विषाणू पक्ष्यांच्या विष्ठेपासून मानवांमध्ये पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO – World Health Organization) मते, २०१३ ते २०१७ या दरम्यान एकूण १५६५ संक्रमण झालेल्या केसेस नोंदवल्या आहेत.

यानंतर २१ जुलै २०२१ रोजी, भारताच्या राष्ट्रीय IHR फोकल पॉईंटने उत्तर भारतातील हरियाणा राज्यातून एव्हीयन इन्फ्लुएंझा A(H5N1) चे एक मानवी प्रकरण WHO ला सूचित केले आहे. भारतातील इन्फ्लूएंझा A(H5N1) विषाणूच्या मानवी संसर्गाचे हे पहिले प्रकरण आहे. त्यामुळे या आजाराची व्याप्ती वाढतेय का काय? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत जिथे ३९% एव्हियन इन्फ्लूएन्झा संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे तिथे WHOच्या मते या विषाणूचे मानवी-ते-मानवी संसर्ग असामान्य आहे. हा विषाणू आफ्रिका, आशिया आणि युरोपच्या पन्नासहून अधिक देशांमध्ये पसरला आहे. मात्र तरीही अद्याप कोणत्याही देशाकडे या आजारावरील कोणतीही लस वा औषधी उपलब्ध नाही.