| |

हृदयाची काळजी घेण्यासाठी शेंगदाणा आहे ना; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दररोजची बदलती जीवनशैली, दैनंदिन वैयक्तिक समस्या आणि दगदगीचे जीवन यामुळे हृदयविषयक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे जगभरात ह्रदय समस्या असलेले लोक आजकाल मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे. ह्रदयाचे आरोग्य बिघडण्याचे मुख्य कारणचे आपली अयोग्य जीवनपद्धती आहे. मात्र एका संशोधनानुसार, आशिया खंडात ह्रदयरोगाचे प्रमाण कमी आहे आणि याचे कारण शेंगदाणा आहे. होय. विश्वास बसत नाहीये ना? पण हेच सत्य आहे. कारण आपल्या भारतात गरीब, श्रींमत असे काहीही नाही. प्रत्येकाच्या घरी स्वयंपाकात शेंगदाणा काही ना काही बनविण्यासाठी वापरला जातो. मुळात शेंगदाणा हा असा एकमेव सुकामेवा आहे जो सर्वसामान्यांनादेखील परवडतो. त्यामुळे कुणीही याचे सेवन आवडीने करते. शिवाय अधे मध्ये दिवसभरात भूक लागली तर टाईमपाससाठी भाजलेले, खारवलेले, मसालेदार शेंगदाणे बेस्ट. पण दोस्तहो तुम्हाला माहित आहे का? शेंगदाण्याने भूक भागतेच शिवाय ह्रदय रोग, स्ट्रोक अशा आजारापासून आपले संरक्षणही होते आणि म्हणूनच शेंगदाणा हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय मानला जातो.

० शेंगदाणे खाण्याचे फायदे –

१) एका संशोधनानुसार, दररोज मूठभर शेंगदाणे खाल्ल्यास ह्रदयरोगाचा धोका टाळता येतो.

२) जे लोक नियमित शेंगदाणे खातात त्यांना स्ट्रोक आणि ह्रदयरोग कमी होतो. कारण शेंगदाण्यामध्ये गुड फॅट्स, फायबर, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. जे ह्रदयासाठी उत्तम असते.

३) शेंगदाणे खाण्यामुळे आपले कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं.

४) शेंगदाणे नियमित खाल्ल्यास रक्तदाब सुधारतो.

५) शेंगदाणे खाणे आणखी एका गोष्टीचा लाभ देते. ते म्हणजे आपल्या शरीराला योग्य प्रमाणात अॅंटिऑक्सिडंट मिळतात.

६) जे लोक नियमित आपल्या आहारात योग्य प्रमाणात शेंगदाणे खातात त्यांच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होण्यापासून बचाव होतो.

७) शरीराचा दाह आणि जळजळ कमी करण्यासाठीदेखील शेंगदाणा फायदेशीर आहे. यासाठी आहारात अख्ख्या शेंगदाण्याऐवजी त्याचे तेल वापरले तरीही चालते.

८) मधुमेहाने ग्रासलेल्या लोकांनी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी शेंगदाणा जरूर खावा पण याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

या सर्व कारणांमुळे ह्रदयाचे आरोग्य सुधारते आणि आपली प्रकृती चांगली राहते.

० ह्रदयरोग टाळण्यासाठी शेंगदाणे कसे खावे?
– शेंगदाणे खाणाऱ्या प्रत्येकाची आवड हि वेगळी असू शकते. काही जण कच्चे शेंगदाणे खाणे पसंत करतात. तर काही, भाजलेले, तळलेले, खारवलेले, मसालेदार शेंगदाणे खाणे पसंत करतात. मात्र ह्रदयाचे संरक्षण करायचे असेल तर नियमित चार पाच शेंगदाणे, अक्रोड, काजू. बदाम असा सुकामेवा एकत्र करून तव्यावर हलका रोस्ट करा आणि खा. सुका मेव्याला तेल, मीठ, तिखट लावून खाणे आरोग्यासाठी लाभदायक नाही. परंतु भाजलेले शेंगदाणे सालीसकट खाल्ले तरीही चालतात.

  • टीप – शेंगदाणे आरोग्यवर्धक असले तरीही त्याचे सेवन करण्याचे प्रमाण निश्चित असावे. अन्यथा याचे दुष्परिणाम होऊ शकतात. ते म्हणतात ना, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये अगदी तसेच काहीसे शेंगदाण्याबाबत आहे.