| | |

आता लक्षवेधक सौंदर्यासाठी महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सची गरज नाही; जाणून घ्या घरगुती उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आता सुंदर दिसायचं म्हणजे भरपूर महाग असणारी सौंदर्य प्रसाधने बाजारातून आणावी लागणार. त्यानंतर ती वापरण्यासाठी जाणकारांची सहाय्यता घ्यावी लागणार. म्हणजे एकंदरच बाजारातील सौंदर्य आपल्याला महाग पडणार.. नाही का? पण असं कुणी सांगितलं कि सुंदर चेहऱ्यासाठी अमाप खर्च करणे गरजेचे आहे. आज प्रदूषणयुक्त जीवनात चेहरा नितळ, तजेलदार ठेवणे कठीण आहे हे मान्य आहे. आपण आपल्या घरातच अशी काही जबरदस्त सौंदर्य प्रसाधने आहेत जी आपल्या त्वचेची आतून काळजी घेऊ शकतात. अगदी प्राचीन काळापासून नैसर्गिक पदार्थांचा सौंदर्य वाढविण्यासाठी उपयोग केला जातो. मग समजून जा त्याची पावर काय असेल. चला तर मग फार फाफट पसारा न करता थेट आपल्या घरगुती ब्युटी प्रोडक्ट्सकडे वळूया. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) ऑर्गन ऑईल – ऑर्गन ऑईल हे ऑर्गन झाडाच्या फळातील बियांपासून तयार केलं जातं. या बियांमधील गरापासून हे तेल काढतात. आफ्रिकेतील मोरोक्कोमध्ये ऑर्गनची झाडे आढळतात. म्हणून ऑर्गनच्या फळाला ‘मोरक्को’ म्हणतात. अगदी कमी प्रमाणात केल्या जाणाऱ्या उत्पादनामुळे हे तेल महाग मिळते. मात्र याचा परिणाम दीर्घकालीन आहे. फेशियलसाठी खूप आणि वारंवार खर्च करण्यापेक्षा एकदा हे ऑईल विकत घेऊन घरच्याघरी नैसर्गिक चमक मिळवता येते. कारण ऑर्गन ऑइलमध्ये व्हिटॅमिन ‘ए’, व्हिटॅमिन ‘ई’, अँटीऑक्सीडेंट, ओमेगा 6 फॅटी ऍसिड,लीनोलिक ऍसिड आणि बरीच पोषक तत्वं असतात. जी त्वचेचं व्यवस्थित पोषण करण्यास सहाय्यक आहेत.

० फायदे – ऑर्गन ऑइल त्वचेला शुष्क होण्यापासून वाचवतं. ऑर्गन ऑईलचा वापरामुळे त्वचा सुंदर, तजेलदार आणि चमकदार बनते. चेहऱ्यावर पिंपल्स डाग, खड्डे वा सोरायसिस असल्यास यावर ऑर्गन ऑईल वापरता येते. यासाठी चेहऱ्याला दिवसातून दोनदा ऑर्गन ऑईलने मसाज करा.

२) चहाचं पाणी – चहा पावडर तर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात असते. हीच चहा पावडर आपल्याला सौंदर्य देण्यास सहाय्यक आहे. यासाठी एका पातेल्यात २ कप पाण्यामध्ये १ चमचा चहा पावडर चांगली उकळू येऊ द्या आणि ते पाणी गार करून गाळून घ्या. आता हे पाणी बर्फाच्या ट्रेमध्ये घाला आणि फ्रिजरमध्ये ठेवा. यानंतर काही तासांनी तयार बर्फाचे क्यूब घेऊन चेहऱ्यावर ॲंटी क्लॉकप्रमाणे अलगद फिरवा. आता थोडावेळ ते पाणी तसंच चेहऱ्यावर सुकू द्या. यानंतर पाण्याने हळूवार धुऊन टाका.

० फायदे – चहाच्या पाण्यामुळे चेहऱ्यावरील धूळ व माती निघून जाण्यास मदत होते. याशिवाय चेहऱ्यावरील डाग निघून जाण्यास मदत होते.

३) संत्र्याची साल – संत्री खाताना त्याची साल फेकण्यापेक्षा त्याची पूड तयार करा. यासाठी संत्र्याच्या साल कडकडीत उन्हात वाळवा आणि मिक्सरला बारीक पूड करून घ्या. ही संत्र पूड नैसर्गिक स्क्रबर म्हणून वापरा आणि चेहरा आतून स्वच्छ करा. यासाठी, २ ते ३ चमचे संत्र्याची पावडर आणि तेवढंच गुलाब पाणी घ्या. आता हे मिश्रण व्यवस्थित मिसळून चेहऱ्यावर हळूवार हाताने लावा. हा फेसपॅक असाच चेहऱ्यावरच सुकू दया. चेहऱ्याला ओढ जाणवायला लागली की कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.

० फायदे – संत्राच्या सालीमध्ये ॲस्ट्रीजेंट असतात. जे त्वचेची छिद्र बंद करायला मदत करतात आणि पिंपल्स पासून मुक्ती देतात. संत्र्याच्या मंद सुवासाने तुम्हांला अगदी फ्रेश वाटेल, चेहरा नितळ व्हायला सुरुवात होईल.

४) लिंबाचं तेल – लिंबाच्या तेलामध्ये ॲंटीबॅक्टेरियल तत्वं असतात. त्यामुळे लिंबाचं तेल चेहऱ्यावर आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा होणाऱ्या बॅक्टेरियांना पळवून लावतात. यासाठी लिंबाचं तेल जोजोबा तेलासह मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. असे आठवड्यातून २ वेळा करा.

० फायदे – लिंबाच्या तेलामुळॆ पिंपल पासून मुक्ती मिळते. लिंबाच्या तेलातील तत्वं चेहऱ्यावरचे डाग कमी करतात. त्यामुळे चेह-याचा तजेलदारपणा वाढतो. तसेच लिंबाच्या तेलानं वाढत्या वयामुळे येणाऱ्या सुरकुत्या देखील कमी होतात.