| |

घोंगडीचा वापर करणाऱ्याला औषधांची गरज काय?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. हिवाळ्याचा मौसम सुरु झाला कि वेगवेगळ्या भागात थंडीचा विशेष असा प्रभाव दिसून येतो. जसे कि मुंबई पुण्यासारख्या भागांमध्ये प्रदूषण आणि धावत्या गाड्या यांमुळे फारसे थंडीचे वातावरण जाणवत नाही. मात्र ज्या भागात दाट झाडी, हिरवळ, शेत, ऊस, डोंगर, घाट , दऱ्या आणि नद्यांचे भाग असतात त्या ठिकाणी प्रामुख्याने थंडी कडाडून जाणवते. अश्या थंडीमध्ये सर्दी, पडसे, ताप, पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. कधी कधी हि थंडी न साहणारी असते. यापासून काळजी घेण्यासाठी घोंगडीचा वापर प्रामुख्याने करणे फायदेशीर आहे.

० घोंगडी कशी तयार केली जाते?
– मेंढ्यांना गावच्या रानामाळाच्या ठिकाणी तलाव वा नदीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतले जाते. त्यानंतर स्वच्छ ठिकाणी नेऊन त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. कातरलेली हि लोकर पिंजुन त्यातील काळी व पांढरी लोकर वेगवेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. या सुताला चांगला पीळ व मजबुती यावी आणि घोंगडी विणायला अगदी सोपी जावी यासाठी सुताला रात्रभर भिजवलेल्या चित्चोक्यांच्या खळीमध्ये भिजत ठेवले जाते. त्यामध्ये हळद आणि आयुर्वेदिक वनस्पतीचा अर्क मिसळला जातो. साधारणपणे एक घोंगडी विणायला २-३ दिवस लागतात. पूर्वी जवळपास १२ फूट लांबीची घोंगडी विणली जायची. मात्र, आता मागणीनुसार हवी बनवून दिली जाते. सर्वसाधारणपणे एक घोंगडी विणायला ३ ते ४ किलो लोकर वापरली जाते.

० मेंढ्यांच्याच लोकरीपासून घोंगडी का बनवली जाते? त्याचे फायदे काय?
– घोंगडी मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवण्याचे विशेष कारण म्हणजे मानवी जीवनात घोंगडी हा खुप महत्वाचा घटक आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे, घोंगडी हे एक प्रकारचे औषधच आहे. जे अनेक मोठमोठ्या रोगांपासून आपला बचाव करतात. होय. मेंढीच्या लोकरापासून बनलेल्या घोंगडीचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत. जाणून घ्या खालीलप्रमाणे :-

१) पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखी अश्या अनेक आजारांवर घोंगडी वापरल्यास नियंत्रण मिळवता येते. यामध्ये जेण (घोंगडीचा एक जाड प्रकार) वापरणे जास्त फायद्याचे आहे.

२) घोंगडी वापरल्यास रात्रीची झोप येत नसेल तर सहज झोप लागते. अशा व्यक्तींनी घोंगडी वापरल्यास याचा परीणाम दिसुन येतो व शांत झोप लागते.

३) याशिवाय उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.

४) तसेच कांजण्या, गोवर, अंगावरील पित्त व तापातही घोंगडीचा वापर लाभदायी आहे.

५) घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमासुद्धा दूर होतो.

६) घोंगडी थंडीमध्ये गरमी आणि उन्हाळ्यात थंडावा देते.

७) घोंगडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण असे किटक व प्राणी जवळ सुद्धा येत नाहीत.

८) अर्धांगवायूचा धोकासुद्धा घोंगडीमुळे टळतो.

९) घोंगडीमुळे शरीरातील रक्तदाब व्यवस्थित राहतो.