WeightLossFood
| | |

‘हे’ 6 पदार्थ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। वजन वाढणे हि समस्या आजकाल प्रत्येक व्यक्तीत दिसून येते. याचे कारण म्हणजे चुकीची जीवनशैली, चुकीची आहार पद्धती आणि कमी पाणी पिणे. यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रयत्नांत असलेले लोकसुद्धा वजन वाढण्याचे शिकार होतात. अशावेळी वजन वाढण्यासोबत टेन्शनसुद्धा येत. मग यामुळे तणाव वाढतो आणि वजन कमी करण्यासाठी आणखीच त्रास होतो. कधी-कधी वजन कमी करण्याचे काही खास फंडे असतात. ते जर वापरले तर फायदाच होतो. हे खास फंडे पोटासाठी फायदेशीर असतील तर.. क्या बात है। पण पोटाची काळजी घेऊन वजन कमी करता येत यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. याचसाठी आम्ही तुम्हाला काही खास पदार्थांची ओळख करून देणार आहोत. जे पदार्थ आरोग्यविषयक इतर समस्यांसह वजन कमी करण्यासाठी १००% फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-

१) गरम पाणी, मध आणि लिंबाचा रस – सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्या. दररोज या पेयाचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते. शिवाय पोटावरील अतिरिक्त चरबी दूर होते. या पेयाचे सेवन केल्याने शरीर देखील डिटॉक्स होतो.

२) ग्रीन टी आणि लिंबू – वाढत्या वजनाला नियंत्रित करण्यासाठी ग्रीन टी आणि लिंबू हे पेय अतिशय फायदेशीर आहे. कारण यामध्ये कॅलरी कमी असतात. हे पेय वेगाने कॅलरी बर्न करते. यासाठी दिवसभरात २ ते ३ कप ग्रीन टी प्या.

३) अंडी आणि पालक – अंड्यांमध्ये उच्च प्रथिने असतात. त्यामुळे शरीराची गरज पूर्ण होते. दरम्यान अंड्यासोबत पालक खाल्ल्यास वजन कमी करण्यासाठी लाभ होतो. एका अभ्यासानुसार, आयर्नने समृद्ध पालक अंड्यांसह खाल्ल्याने वजन कमी होत.

४) सफरचंद आणि पीनट बटर – सफरचंद आणि पीनट बटर हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. पीनट बटरमध्ये मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅट असतं. यामुळे पोट बराचवेळ भरलेलं राहत. त्यामुळे सफरचंद आणि पीनट बटर एकत्र खा.

५) हिरव्या पालेभाज्या आणि ऑलिव्ह ऑइल – हिरव्या पालेभाज्या आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र खाल्ल्याने भुक नियंत्रित करता येते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचे एकत्र खाल्ल्याने वेगाने वजन कमी होतं.

६) ओट्स आणि बेरी – रास्पबेरी आणि ब्लूबेरीमध्ये वेगवेगळे प्रकाराचे अँटी-ऑक्सीडेन्ट असतात. त्यामुळे ओट्ससोबत ह्यांचे सेवन केल्याने वेगाने वजन कमी होत.