Tuesday, January 3, 2023

कच्च्या हळदीचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे

आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  हळदीचा वापर हा आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत करते. कच्ची हळद जर आपल्या आहारात  ठेवली तर मात्र आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी आपल्या शरीरात हळदीच्या दुधाचे सेवन सुद्धा केले जाऊ शकते. कच्ची हळद हि आपल्याला थंडीपासून बचाव करण्याचे काम करते. कच्या हळदीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात ….

आपल्या दररोज च्या जीवनात जर थंडीपासून बचाव करण्याचे असेल तर अश्या वेळी तुमच्या आहारात कच्या हळदीचा समावेश हा केला जावा. इतर आयुर्वेदीक उपचारांपेक्षा हळद हि आपल्या शरीराला गुणकारी आहे. हिवाळ्यात लोक थंडी पासून बचाव करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय वापरतात, जेणे करून निरोगी आणि थंडी पासून वाचता येईल. हळदीच्या तुलनेत कच्या हळदीचा रंग आणि चव हि  छान असते. अनेक वेळा भाज्यांमध्ये बाजारातून आणलेली हळद वापरण्याऐवजी कच्या हळदीचा वापर हा केला जावा. कच्ची हळद हि आल्यासारखी असते.

हिवाळ्याच्या हंगामात हळदीची गाठ सर्वात जास्त फायदेशीर आहे आणि हे हळदीच्या गुणधर्माला वाढवतो. कच्च्या हळदीमध्ये हळद पावडरच्या तुलनेत जास्त गुणधर्म असतात. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की कच्च्या हळदीच्या वापराच्या दरम्यान निघणारा रंग हळदी पावडरच्या तुलनेत जास्त दाट आणि घट्ट आहे. कच्ची हळद, आल्या सारखी दिसते. याचा ज्यूस मध्ये, दुधात उकळवून, तांदुळाच्या पदार्थात, लोणच्यात, चटणीत आणि सुपामध्ये मिसळून वापर केली जाते. कच्या हळदीचे काही विशेष गुण आपण जाणून घेऊया …

—- पुरुषांमध्ये होणाऱ्या प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशींना वाढण्यासह त्यांचा नायनाट देखील करतात. हानिकारक रेडिएशनचा संपर्कातआपले शरीर जर आले असेल तर त्यावेळी निर्माण होणाऱ्या ट्युमर पासून रक्षण करण्याचे काम कच्ची हळद करते.

—- हळदी मध्ये सूज रोखण्याचे विशेष गुणधर्म आहे.

— कच्ची हळद हि सांधेदुखीच्या आजारांसाठी जास्त फायदेशीर आहे.

— आपल्या शरीरातील पेशींना संपवण्यासाठी जे रॅडिकल काम करतात त्यांना नष्ट करण्याचे काम हळद करत असते.

—- जर आपल्या शरीरावर जखम झाली असेल तर त्यांना दूर करण्याचे काम हळद करते.

—- कच्च्या हळदीमध्ये इन्स्युलिन पातळी संतुलित ठेवण्याचे गुणधर्म आहे. अशा प्रकारे हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

—- आपली शरीरात ग्लुकोज चे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम हळद करते.

— केलेस्टरॉल ची पातळी कमी करण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो.

— वजन कमी करण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर केला जातो.


आवडल्यास नक्की शेअर करा

हे तुम्ही वाचायलाच हवे...