These are the benefits of steaming in the cold

थंडीमध्ये वाफ घेण्याचे ‘हे’ आहेत फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  जगभरात अजूनही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.  काही दिवसांपूर्वी भारतात आलेल्या कोरोना वॅक्सीन मुळे कोरोनाला जास्त घाबरण्याचे कारण नाही. पण तरीही कोरोनाच्या संसर्ग होण्यापूर्वी आपली काही प्रमाणत काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाच्या लसीमुळे आजारातून बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे . पण कोरोनाच्या काळात आपली प्रतिकार शक्ती चांगली असणे गरजेचे आहे. त्याच्यासाठी आपल्या आहारात आणि आपल्या दररोज च्या दैन्यंदिन काळात काही बदल करणे अपेक्षित असते. आपल्या शरीराला वाफ घेणे हे किती फायदेशीर आहे त्याची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूयात …..

कोरोनाच्या काळात प्रत्येक जण आपली प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी खूप काळजी घेत आहे. सर्दी , खोकला यापासून दूर राहण्यासाठी प्रत्येक जण विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत. कोरोनाच्या काळात जर आपण वाफ घेतली तर त्याचे अनेक फायदे आपल्यासाठी आहेत. वाफ घेण्याची सुद्धा एक ठराविक पद्धत आहे. त्यानुसारच आपण प्रयत्न केले पाहिजेत.

वाफ घेण्याची पद्धत —–

जर तुमच्याकडे वाफ घेण्याची मशीन असेल तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात म्हणजे कमीत कमी तीन ग्लास पाणी घ्या ते पाणी पूर्ण उकळून घ्या . त्यानंतर आपले तोंड त्या पाण्याकडे न्या. आपल्या तोंडावर टॉवेल टाकून त्याच्या साह्याने वाफ घ्या, म्हणजे ती वाफ हि पूर्णतः आपल्या शरीरात जाईपर्यंत त्याचा वापर हा केला जावा.

जर तुम्ही प्रदूषणात खूप फिरत असाल तर त्यावेळी तुम्ही दररोज काही मिनिटे तरी वाफ घेणे अपेक्षित असते. अश्या वेळी तुम्ही दररोज काही मिनिटे वाफ हि घ्या. वाफ घेतल्याने आपल्या चेहऱ्यावर येणारे पिंपल्स पूर्णतः कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपला चेहरा हा स्वच्छ दिसण्यास मदत होते.