dress

हे ड्रेस मॅट्रिअल आहेत सध्या ट्रेंडिंग मध्ये

हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेक मुलींना दररोज वेगवेगळ्या प्रकारची फॅशन करायला आवडते. फॅशन म्हंटल कि मुलींच्या जिव्हाळाच्या विषय असतो. त्या या एकाच विषयावर तासंतास गप्पा मारू शकतात . बाजारात एखादा नवीन फॅशन आली कि मात्र त्यावेळी त्या अश्या नवीन ड्रेस चा वापर हा करतात. सध्या बाजारात अगदी सॉफ्ट असणाऱ्या ड्रेसची फॅशन आली आहे .

देवी सिल्क— 

देवी सिल्क हा प्रकार एकदम चकचकीत असतो. यामध्ये बरेच प्रकार आणि रंग येतात. याचे कुुडते आणि स्ट्रेट फिट पँट शिवल्यानंतर एक चांगला लुक देतात. जर तुम्हाला प्लेन मटेरिअल आवडत असेल तर हा प्रकार फक्त तुमच्यासाठी आहे असेच समजा. याची फिटिंग खूप चांगली बसते. याला स्टाईल करताना तुम्ही मिस मॅच दुपट्टा घेऊ शकता. यावर जॉर्जेट दुपट्टा चांगला दिसतो.

इक्कत प्रिंट —

हि साधारण प्रकारची प्रिंट असते . पण त्याचा रंग हा खूप जास्त डार्क नसतो. त्यामुळे त्याच्यापासून कोणताही ड्रेस शिवला तर त्यामुळे तुमचे लुक हे अजून खुलून दिसायला मदत होते . त्याच्यावर कोणत्याही रंगाची ओढणी हा घेतली तर फायदाच होतो. या कपड्यामध्ये अजिबात गरम होत नाही . उन्हाळ्याच्या दिवसांत हा कपडा खूप फायदेशीर आहे .

जयपूर प्रिंट —

जयपूर प्रिंटची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या प्रिंट खूप नाजूक आणि सुंदर असतात. जयपूर च्या कपड्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही प्रकारचा ड्रेस शिवू शकता. त्याची कुर्ती तसेच त्याबरोबर असलेली पॅन्ट सुद्धा खूप छान दिसते . यामध्ये तुम्हाला खूप व्हरायटी  मिळते. कुडता, लाँग बॉटम, पलाझो, स्कर्ट, मॅक्सी ड्रेस या सगळ्यांसाठी हा कपडा उत्तम आहे.