| | |

रोजच्या वापरातील ‘हे’ पदार्थ कॅन्सरपासून देतात संरक्षण; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कर्करोगामुळे केवळ एका व्यक्तीचे नुकसान होत नाही तर संपूर्ण कुटुंबाचे नुकसान होते. कारण आपल्यातील एखाद्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या कोणताही त्रास होत असेल तर निश्चितच त्याचे निकटवर्तीय प्रभावित होतात. यादरम्यान सततचा खर्चिक उपचार आणि उपचार पद्धतींमुळे ढासळणारी प्रकृती दोन्ही असह्य करणारी असते. पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का असे अनेक पर्याय आपल्या माहितीत उपलब्ध आहेत ज्यांच्या साहाय्याने आपण कॅन्सरसारख्या रोगापासून आपले संरक्षण करू शकतो. हे पदार्थ अगदी आपल्या स्वयंपाकघरात रोजच्या वापरासाठी प्रसिद्ध आहेत. चला तर जाणून घेऊयात हे कोणते पदार्थ आहेत ते खालीलप्रमाणे:-

१) पाणी – दिवसभरात प्रत्येकाने किमान ३-५ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे, दूषित व घाणेरडे पाणी पिणे टाळा. कारण यामुळे कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे फक्त शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्या. याशिवाय रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा. त्यात ३ ते ५ तुळशीची पाने घाला. कर्करोग टाळण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो.

२) गाईचे दूध – गाईच्या दुधात इतकी शक्ती असते की आपली रोग प्रतिकारशक्ती अगदी सहज वाढवण्यासाठी हे दूध मदत करते. इतकेच नव्हे तर यामुळे आपल्या शरीराचे अनेको रोगांपासून संरक्षण होते. गाईच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आपण कर्करोगाला निश्चितच दूर ठेऊ शकतो.

३) हळद – प्रत्येक स्वयंपाक घरात हळदीचे एक विशेष स्थान असते. कारण अनेको अन्न पदार्थ हळदीच्या वापराशिवाय अधुरेच असतात. याशिवाय हळदीला भारतीय संस्कृतीत एक मनाचे स्थान आहे. कारण तिचा वापर चांगल्या आणि शुभ कार्यासाठीदेखील केला जातो. या व्यतिरिक्त हळद अँटिसेप्टिक गुणधर्मयुक्त असल्याने त्याचा वापर विविध रोगांवर परिणामकारक आहे. यामुळे हळदीचा दररोज वापर केल्याने कर्करोगापासून संरक्षण मिळवता येते.

४) लसूण – आपल्या रोजच्या वापरातील लसूण कर्करोगाच्या रुग्णांसाठी एक उत्तम औषध आहे. त्यामुळे जर कर्करोगाच्या रुग्णाला लसणाची पूड करून पाण्यात विरघळवून प्यायला दिली तर ते कर्करोगाच्या आजारात खूप फायदेशीर ठरते. याशिवाय कर्करोग होऊच नये म्हणून लसणाचे पाणी पिणे फायद्याचे ठरते.

५) सोया- सोया कर्करोगाशी लढण्यासाठी प्रभावी आहे.सोयामध्ये असलेले ओमेगा 3 पोषक तत्त्वे देऊन कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांना रोखू शकते. म्हणून, आपल्या अन्नात जास्तीत जास्त सोया वापरा. हे ट्यूमर वाढू देत नाही आणि त्याचा आकार देखील कमी करतो.

६) तुळस – प्रत्येकाच्या घरात तुळशीचे रोप असतेच आणि यामागे बरीच आध्यात्मिक तितकीच वैज्ञानिक कारणे आहेत. तुळशीला भारतीय संस्कृतीमध्ये पावित्र्याचे स्थान आहे. शिवाय तुळस अनेक आजारांवर प्रभावी औषधी आहे. इतकेच काय तर तुळशीला कर्करोगाचा किलर असे म्हटले जाते. त्यामुळे दररोज २-३ तुळशीची पाने खा. असे केल्याने आपल्याला केवळ सर्दी होण्याची शक्यता कमी होणार नाही तर कर्करोग देखील टाळता येईल.

७) कडुनिंब – आयुर्वेदातील अत्यंत प्रभावी औषधांपैकी एक म्हणजे कडुनिंब. त्यात कर्करोगाशी लढण्याची शक्ती कडुनिंबामध्ये आहे. त्यामुळे जर कर्करोगाच्या रुग्णाला दररोज ८ ते १० कडुलिंबाची पाने चावून खाण्यास दिली तर त्याचे आरोग्य लवकर सुधारते.