| | |

पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घेतील ‘हे’ फेस पॅक; जाणून घ्या साहित्य आणि कृती

हॅलो आरोग्य ऑनलाईन। फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. त्यामुळे नेहमीच डॉक्टर आपल्याला ताजी आणि स्वच्छ धुतलेली फळे खाण्याचा सल्ला देतात. कारण फळे खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि आपण निरोगी राहतो. त्यामुळे दररोज आपल्या आहारात फळांचा समावेश असेल, तर अनेक रोगांपासून आपले संरक्षण होते. पण सांगायची मूळ बाब अशी कि, फळे केवळ शारीरिक आरोग्याची काळजी घेत नाहीत तर सौंदर्याचीही काळजी घेतात.

– विशेषतः पावसाळी हंगामात त्वचेच्या समस्यांमध्ये वाढ झालेली असल्यामुळे सौंदर्याबाबत चिंता निर्माण होते. यासाठी काही फळे अत्यंत फायदेशीर असतात. यात प्रामुख्याने लिंबू आणि संत्र्याचा समावेश केला तर त्वचेसोबत केसही सुंदर होण्यास मदत होते. शिवाय लिंबू आणि संत्र्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. तसेच त्यात व्हिटॅमिन सी देखील असते. जे केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त कोलेजनच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन सी आवश्यक असते जे या फळांमध्ये समाविष्ट आहे. आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी खालील फेसपॅक लाभ देतील. जाणून घ्या:-

१) पावसाळ्यात चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण दही, लिंबू आणि अ‍ॅपल सायडर व्हिनेगर यांचा फेसपॅक वापरू शकतो. यासाठी
० साहित्य – २ चमचे दही, २ चमचे लिंबाचा रस आणि ४ चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घ्या.
० कृती – वरील सर्व साहित्य मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा. हि पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. यानंतर साधारण २० मिनिटांनी आपला चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

२) संत्री, अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि बेसन पीठाचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी
० साहित्य – १ चमचा संत्र्याच्या सालीचा किस, २ चमचे बेसन पीठ आणि ६ चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घ्या.
० कृती – वरील साहित्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट साधारण १० मिनिट फ्रीमध्ये ठेवा. यानंतर ती संपूर्ण चेहऱ्याला लावा. पुढे २० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *