| | |

मेंदूच्या कार्य सुधारणेसाठी आहारात ‘हे’ पदार्थ महत्वाचे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दिवसभराची दगदग ताण आणि थकवा आपल्या मेंदूच्या कार्यावर थेट परिणाम करत असतो. ज्यामुळे सर्व काही नियंत्रित आहे असे वाटत असतानाही आपण उदास असतो. कारण मेंदू आपल्या सर्व क्रिया नियंत्रित करत असतो. कारण मेंदू आपल्या शरीराचा मुख्य अवयव आहे जो प्रत्येक कार्याशी एक जटिल संबंध सामायिक करतो. त्यामुळे मेंदूचे कार्य व्यवस्थित आणि सुरळीत चालू असणे अत्यंत गरजेचे आहे.

मात्र कामाचा ताण, शरीराचा थकवा, दगदगीची जीवनशैली, चुकीचा आहार, अपुरी झोप यामुळे मेंदूचे कार्य प्रभावित होते. परिणामी माणसाच्या मानसिकतेवर याचा उलट परिणाम होण्याची शक्यता बळावते. म्हणून मेंदूचे कार्य सुधारायचे असेल आणि व्यवस्थित ठेवायचे असेल तर आहारात काही पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. हे पदार्थ कोणते ते आज आपण जाणून घेणार आहोत.

१) पालेभाज्या –
पालेभाज्यांमध्ये फोलेट, आयर्न, व्हिटॅमिन बी 9 आणि फायबर असे पोषक तत्व असतात. यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारायचे असेल, तर दररोज हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे फायदेशीर आहे.

२) मसाले –
जेवणाची चव वाढवणारे मसाले मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. कारण यातील अँटी- इम्फ्लेमेटरी आणि अँटी- ऑक्सिडंट्स तसेच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि जळजळ दूर करणारे घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच कर्क्युमिनसारखे संयुग अस्वस्थता वा चिंतेचा धोका कमी करते आणि ब्रेन केमिस्ट्री चांगले बनवते.

३) आंबवलेले पदार्थ –
आंबवलेल्या पदार्थांमध्ये बॅक्टेरिया आणि यीस्ट असते. जसे की दही, किमची, कंबुचा आणि कोअरक्रॉट हे पदार्थ चांगल्या बॅक्टेरियाचे स्रोत आहेत, जे आतड्याचे कार्य सुधारतात आणि चिंता कमी करतात.

४) डार्क चॉकलेट –
डार्क चॉकलेट चवीला कडू असले तरी हॅपी हार्मोन्ससाठी अतिशय लाभदायक आहे. त्यामुळे मेंदूच्या कार्यात सुधार आणण्यासाठी डार्क चॉकलेट खाणे अतिशय फायदेशीर ठरते. यातील आयर्न आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म मेंदूच्या कार्यात सुधार आणतात.

DryFruits

५) सुकामेवा –
सुका मेव्यामध्ये हेल्दी फॅट भरपूर असतात. यामुले मेंदूच्या कार्यास चालना मिळते. तसेच यातील ओमेगा – 3 फॅटी अ‍ॅसिडमध्ये अँटी-इम्फ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म स्मृती आणि विचार सुधारण्यासाठी मदत करतात. अक्रोडमध्ये ओमेगा – 3 फॅटी अ‍ॅसिड्सचे अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म स्मरणशक्ती आणि विचारशक्ती सुधारतात.

avocado

६) एवोकॅडो –
एवोकॅडो मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत आहे. यातील पोषकतत्व मेंदूच्या कार्याचे संतुलात ठेवते. यामुळे उत्तेजित नैराश्याच्या उपचारात मॅग्नेशियमचा फायदा दिसून येतो.