| | |

अंमली पदार्थांइतकेच रोजच्या वापरातील ‘हे’ पदार्थ करतात आरोग्याचा घात; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो तुम्हाला खूप गोड आणि खरे पदार्थ खायला आवडतात का? जर याचे उत्तर हो असे असेल तर आताच सावध व्हा।कारण तुम्ही स्वतःच सव आताच्या आरोग्याचे नुकसान करत आहेत. ज्या प्रमाणे एखाद्या अंमली पदार्थाचे सेवन हे आपल्या शरीरासाठी घातक असते अगदी त्याचप्रमाणे मीठ आणि साखर या दोन पदार्थांचे अति सेवन आपल्या शरीराचे नुकसान करते.

याचे कारण म्हणजे, आपल्या मेंदुत एक रिवॉर्ड सिस्टीम असते. जी आपल्याला संवेदना पाठवते. याद्वारे आपण आपल्याला काय आवडतं आणि काय नाही? हे सहज ओळखू शकतो. कोकेन आणि ड्रग्ज यांसारखे अंमली नशेचे पदार्थ घेतल्यावर जसे ते मेंदुत ‘डोपामिन’ नावाचं द्रव्य संप्रेरीत करतात, ज्यामुळे तात्काळ खुप छान वाटतं, हवेत उडल्यासारख वाटत अगदी हे असच साखरेच्या सेवनानेही होत. – एका संशोधनानुसार, ड्रग्ज घेतल्या मेंदुचा जो भाग एक्टीव्ह झाला होता अगदी तोच भाग जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने एक्टीव्ह झाला. थोडक्यात साखर सुद्धा आपल्या मेंदुवर ड्रगसारखाच परिणाम करते हे स्पष्ट झाले.

अर्थात ड्रग्ज आणि गोड पदार्थ ह्या सारख्याच जीवघेण्या आहेत. गोडासोबत खारे पदार्थ देखील असाच परिणाम करण्यास सक्षम आहे. नक्कीच हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. पण मित्रांनो हेच सत्य आहे. अधिक जाणून घ्या खालीलप्रमाणे :-

 

१) साखर – तज्ञांच्या मतानुसार, जेवण झाल्यावर आपलं पोट भरलं का नाही ते आपल्या मेंदुला कळवणारे लॅप्टीन नामक हार्मोन साखर जास्त खाल्ल्याने अकार्यक्षम होते. त्यामुळे आपण आपल्या क्षमतेपेक्षा आणि आवश्यकतेपेक्षा जास्त खातो. परिणामी शरीरातील पॅन्क्रीयाज त्यांच काम करण्यास असमर्थ ठरतात. यामुळे शरीरात लठ्ठपणा, मधुमेह, ह्रद्यरोग, ब्लड प्रेशर आणि दातदुखी यांसारख्या पाहुण्यांचे आगमन होते.

 

२) मीठ – तुम्ही चिप्स खात असालंच.. हो ना? आता एक काम करा चिप्सचं पॅकेट फोडा एखादा चिप्स खाऊन जरा थांबा. तुमच्याने कंट्रोल होईल? होवुच शकत नाही. अगदी क्षणात तुम्ही चिप्सचा फडशा पाडालं आणि त्यातही शेवटचा चिप्स खाताना थोडे हळहळाल. कारण त्यांची चव जादुई असते. या जादूचे कारण एकच, मीठ!.. मीठाचे पदार्थ खाताना आपली जीभ नियंत्रण हरवते आणि तो पदार्थ खुप खावासा वाटतो. मीठ हे माणसाला सिगरेटसारख व्यसन लावतं. कुठल्याही साधारण चवीच्या पदार्थाला मीठ रुचकर चव देते आणि ते खाण्याची मजा वाढवते. पण प्रमाणाबाहेर मीठ खाणे म्हणजे स्वतःहून ह्रद्यरोग, किडणीचे विकार, मेंदुच्या नसांचे नुकसान आणि हाडांचे दुखणे ओढवून घेणे आहे.

 

३) फॅट – फॅट असलेले पदार्थ म्हणजेच बटर, चीज. आता बघा ना साधा पिझ्झापेक्षा चीज पिझ्झा खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कारण ते जीभेला पुन्हा पुन्हा खाण्यासाठी प्रवृत्त करते. परिणामी आपण आवश्यकतेपेक्षा जास्त फॅट्स खातो आणि अनेक रोगांना आमंत्रण देतो. जसे कि, ह्रद्यरोग आणि दुसरा मधुमेह.

 

० काय करालं उपाय?

१) साखर, मीठ आणि फॅट्सच्या पदार्थांशी फटकुन वागा. आपल्या जीभेचे लाड थांबवा आणि आरोग्यास प्राधान्य द्या.

२) असे पदार्थ आहारात येणार नाहीत याची दक्षता घ्या.

३) फास्ट फुड ऐवजी फळांकडे वळा.

४) पौष्टिक आणि पारंपरिक आहार घ्या.

 

० महत्वाचे – परिस्थिती बदलत नसेल तर मनस्थिती बदल कारण आरोग्य असेल तर जगण्याला अर्थ आहे.