Know that your skin stays oily even after frequent cleansing of the face?
|

त्वचेचा  ग्लो वाढवणारे हे पदार्थ  असूद्यात आहारात

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  जर तुमची त्वचा सुदंर बनवायची असेल तर त्यावेळी आहारात काही पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे . आहारात जर योग्य पदार्थांचा समावेश असेल तर त्यावेळी मात्र त्वचेला ग्लो येण्यास मदत होते . त्वचा मुलायम होण्यास सुद्धा मदत होते. त्वचा सुदंर बनवण्यासाठी घरगुती पद्धतीच्या उपायांचा खूप वापर हा केला जातो. पण त्यासाठी आपल्या आहारात सुद्धा योग्य पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे . असे कोणते पदार्थ आहेत , कि ते आपल्या आहारात घेतल्याने आपल्याला आरोग्याच्या पण समस्या जाणवणार नाहीत. तसेच आपल्या त्वचेला ग्लो येण्यास मदत होऊ शकते . ते जाणून घेऊया …

पपई —

केसरी रंगाचे हे फळ आरोग्यासाठी खूप लाभकारक आहे . आरोग्याच्या इतर समस्यांबरोबर त्वचेला चकाकी देण्यास सुद्धा हे फळ खूप मदत करते . हे फळ जवळपास सर्व सिझन मध्ये बाजारात उपलब्ध असते . कच्चा पपईचे सुद्धा खूप औषधी गुणधर्म आहेत , जी पपई पिकली गेली असेल तर ती आहारात पण ठेवू शकता , तसेच ती आपल्या चेहऱ्याला सुद्धा लावू शकता . त्यामुळे आपला चेहरा हा उजळायला मदत होते. पपई मध्ये असलेले कॅलरीज या आपले वजन जास्त वाढू देत नाहीत . वजन जास्त न वाढल्याने आपली त्वचा अजून मुलायम राहण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल चा धोका हा कमी  होतो. महिलांच्या शरीरात हार्मोन्स व्यवस्थित ठेवण्याचे काम पपई करत असते. त्यामुळे महिलांनी आहारात पपई हि ठेवली गेली पाहिजे .

खरबूज —

खरबूज हे कलिंगड सारखे मोठ्या आकाराचे असते . ते ज्यावेळी पिकले जाते. त्याच्या मदतीने अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. असे पदार्थ आहारात असणे सुद्धा गरजेचे आहेत . खरबुजामध्ये असलेले मिनरल्स हे ऍसिडिटी कमी करण्याचे काम करतात. त्यामुळे पचनशक्ती सुद्धा सुधारण्यास मदत होते . त्यामुळे पोटाचे आरोग्य हे चांगले राहण्यास मदत होते . त्याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण हे जास्त असते . त्यामुळे त्वचा हि डिहायड्रेट राहण्यास मदत होते.  खरबूज  हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत हा खरबूज आहे. त्यामुळे डोळयांच्या खाली सर्कल कमी होण्यास मदत होते . ज्या लोकांना मूत्राशयाच्या समस्या आहेत , त्या लोकांनी आहारात खरबूज चा वापर करावा.

अंडी —

आहारात अंडी असणे महत्वाचे आहे . त्यामुळे शरीराला प्रोटिन्स मिळण्यास मदत होऊ शकते. दररोज एक उकडलेले अंडे खाण्यात असेल तर त्यामुळे जास्त प्रमाणात प्रथिने मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे त्वचा अजून चमकदार होण्यास मदत होते . अंड्यामध्ये असलेले कॅल्शियम हे हाडे वाढण्यास मदत होते .

सूर्यफुलाचे तेल —

आहारात सूर्यफुलाच्या तेलाचा समावेश असल्याने आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे वाढणार नाही . सूर्यफुलामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि ओमेगा ऍसिड हे आपल्या चेहऱ्याला मुलायम राहण्यास मदत करते . तुमच्या पायांवर असलेले पोअर्स हे भरण्याचे काम हे सूर्यफुलाच्या तेलाच्या मदतीने केले जाते . तसेच आपल्या शरीरावरील मृत त्वचा काढून टाकण्याचे काम सुद्धा सूर्यफुलाचे तेल करते .

पालक —

हिरव्यागार पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करते . पालकामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. जे तुमचे नख, दात, डोळे यांचे आरोग्य उत्तम ठेवते.पालकामध्ये असलेले मिनरल्स शरीराची उष्णता कमी करुन शरीर शांत ठेवण्याचे काम करते. त्यामुळे उष्णतेमुळे चेहऱ्यावर उमटणाऱ्या समस्या होत नाहीत. पालकामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी हे जीवनसत्व त्वचेवरील तजेला कायम ठेवण्यास मदत करते.