| |

कंबर दुखीवर घरगुती उपाय ठरतील रामबाण; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कंबरदुखी हि समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस होऊ शकते. हि समस्या केवळ वृद्धावस्थेची स्थिती नाही हे आधी समजून घेणे आवश्यक आहे. बसल्या जागी काम करणे, ऑफिस खुर्चीत तासनतास एकाच जागी बसणे, जड वस्तूंची उचलाउचल करणे या कारणांमुळे साहजिकच कंबरदुखी होते. हे दुखणे साधे आणि मर्यादित काळासाठी असेल तर ठीक आहे पण हे दुखणे तीव्र आणि दीर्घकाळ असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक असते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो कंबर दुखी जर सर्वसामान्य असेल तर त्यावर घरगुती उपाय करून दुखणे काही क्षणात वा काळात कमी केले जाऊ शकते. पण हे उपाय नक्की काय? आणि कंबर दुखीचे नेमके कारण काय? याची उत्तर आपल्याकडे असणे गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत.

० कंबरदुखीची सर्वसाधारण कारणे:-
१) अधिक जड वस्तू उचलणे
२) अचानक झटका लागून उठणे/हिसका लागणे
३) चुकीच्या मुद्रेमध्ये उभे राहणे किंवा बसणे/अवघडून हालचाल करणे
४) अधिक तणाव
५) अपघाती मार

० कंबरदुखीवर घरगुती उपाय:-

१) झोपण्याची पद्धत – अवघडून झोपणे वा अडचणीच्या जागेत शिरून झोपणे यामुळे कंबर दुखी होऊ शकते. यासाठी आपल्या झोपण्याच्या पद्धतीत बदल करा. आपलया शरीराचे संपूर्ण वजन पाठीवर आणि कमरेवर टाकुन न झोपता एका कुशीवर झोपा.

२) मानसिक तणाव कमी करा – तणाव आणि टेन्शन यामुळेही कंबर आणि पाठीचे दुखणे वाढते. म्हणून ज्या लोकांना ही समस्या असेल त्यांनी वेळीच तणावावर नियंत्रण मिळवा. यासाठी व्यायाम, योग, ध्यान आणि दीर्घ श्वास घ्या. यामुळे तणाव कमी करण्यास मदत मिळेल.

३) लव्हेंडर तेल – एका संशोधनानुसार, शारीरिक दुखण्यावर अरोमा थेरेपी उपयुक्त ठरते. यासाठी लॅव्हेंडर तेलाचा प्रयोग अतिशय प्रभावी आहे. यासाठी ज्या ठिकाणी दुखत असेल तेथे लव्हेंडर तेलाचे ३-४ थेंब लावुन हलक्या हाताने मालिश करा. हा प्रयोग आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा. यामुळे नक्कीच आराम मिळेल.

४) नियमित व्यायाम आणि योग करा – शरीराला अधिक लवचिक आणि स्वास्थपूर्वक बनवण्याकरिता नियमितपणे व्यायाम आणि योग करा. कारण व्यायाम शारीरिकदृष्ट्या मजबूत बनविते तर योग मानसिक स्वास्थ निरोगी ठेवते.