Tea
| | |

तुमच्या चहाची गुणवत्ता सांगतील ‘या’ घरगुती चाचण्या; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। थंडीच्या हंगामात चाय नाय तर काय नाय. अशा काहीश्या वृत्तीचे प्रमाण जास्त लोकांमध्ये दिसून येते. याचे कारण म्हणजे थंडीत गरमगरम चहा मिळाला तर अंगात थोडी उष्णता जाणवते. मग काय उत्साही भावनांचा संचार कमला वेग देतो आणि आपली कामं भरभर होतात. अहो हे तर काहीच नाही. अनेकांची सकाळ चहाशिवाय होतच नाही. कामाचा कंटाळा, मनावर आलेला ताण, निरुत्साही भावनांवर चहा म्हणजे बेस्ट उपाय.

जगभरात चहाचे निरनिराळे प्रकार घेतले जातात. त्यामुळे चहा संपूर्ण जगातील आवडत्या पेयांपैकी एक पेय आहे. मित्रांनो योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतलेला चहा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. पण तुमचा चहा शुद्ध आहे का? काय तुम्ही तुमच्या चहाच्या गुणवत्तेची कधी तपासणी केली आहे? जर तुमचे उत्तर नाही असे असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, आजकाल बाजारात भेसळयुक्त चहा मोठ्या प्रमाणावर विकला जातो. त्यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच चहा पावडर खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता नक्की तपासून पहा आणि मगच खरेदी करा. आता चहाची गुणवत्ता कशी तपासावी हे जर तुम्हाला ठाऊक नसेल तर जाणून घ्या खालिलप्रमाणे:-

० चहाची गुणवत्ता कशी तपासालं?
– चहाची गुणवत्ता तपासण्यासाठी फार कष्ट घेण्याची गरज नाही. घरच्या घरी तुम्ही चहाची गुणवत्ता तपासू शकता.
चहा पावडर विकत घेताना मानांकीत कंपनीची पावडर घ्या किंवा चांगल्या विक्रेत्याकडून विकत घ्या.
चहा पावडरचा वास घेऊन वा हाताने चिरडूनदेखील चहा पावडरची गुणवत्ता तपासता येते. या व्यतिरिक्त काही सोप्प्या घरगुती चाचण्या करून चहा पावडरची शुद्धता तपासता येईल.

१) पाण्यात मिसळा – तुम्ही चहा पावडरची गुणवत्ता तपासण्यासाठी पाण्याचा वापर करू शकता.
यासाठी १ ग्लास पाण्यात १-२ चमचे चहा पावडर मिसळा.
दोन मिनीटांत पाण्याचा रंग गडद झाला तर समजा की चहा पावडर शुद्ध नाही.
रंग जास्त गडद झाला नाही तर तुमची चहा पावडर वापरण्यासाठी सुरक्षित आहे.

२) हाताने रगडून पाहा – चहा पावडरचा वास घेणे आणि हाताने रगडून पाहणे हा चहा पावडरचा दर्जा ओळखण्यासाठी उत्तम मार्ग आहे.
यासाठी चहा पावडर हाताने रगडून पहा.
तुमच्या हाताला पावडरचा रंग लागला तर पावडर भेसळयुक्त आहे.
शिवाय चहा पावडरला खूप उग्र वास येत असेल तर ती पावडर भेसळयुक्त आहे हे समजून जा.

३) टीश्यू पेपर – टीश्यू पेपरने तुम्ही चहाची गुणवत्ता तपासू शकता.
यासाठी टीश्यू पेपरवर थोडी चहापावडर ठेवा आणि त्यावर थोडं पाणी शिंपडून काही वेळ उन्हात ठेवा.
जर चहा पावडर चांगल्या गुणवत्तेची असेल तर त्याचे डाग लगेच टीश्यू पेपरवर पडणार नाहीत.
मात्र टीश्यू पेपरवर तेलकट आणि गडद डाग दिसले तर चहा पावडरमध्ये भेसळ आहे.