These mistakes can hurt the knees
|

गुडघ्यांना त्रासदायक ठरताहेत या चुका

हॅलो आरोग्य  ऑनलाईन । गुडघे दुखी हि मुख्यतः ज्या लोकांचे वय हे जास्त झाले आहे त्या लोकांनाच गुडघा दुखी च्या समस्या या जास्त प्रमाणात जाणवतात. गुडघा दुखी हि जर जास्त प्रमाणात वाढत असेल तर त्यावेळी चालायला सुद्धा प्रचंड त्रास हा होतो. गुडघा याच्या हालचाली काही प्रमाणात केल्यास किंवा त्या हालचाली जर कमी प्रमाणात झाल्या तर सुद्धा गुडघे दुखीचा त्रास हा जाणवतो. शारीरिक हालचाली यांचा वाढत असलेला वेग यामुळे सुद्धा कधी कधी त्रास हा जास्त जाणवतो. गुडघ्याची काळजी घेताना कश्या प्रकारे काळजी हि घेतली गेली पाहिजे याची माहिती घेऊया ….

गुडघ्यातील वेदना —

जर तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त गुडघ्याचा त्रास जाणवत असेल तर त्यावेळी अजिबात दुर्लक्ष केले जाऊ नये. छोट्या छोट्या असणाऱ्या वेदना सुद्धा या आपल्याला त्रासदायक ठरतात. काही प्रमाणात व्यायाम हा ठवू द्यावा .

जास्त लठ्ठ्पणा —-

आपल्या शरीराचे जर वजन हे जास्त असेल तरीसुद्धा या समस्या काही प्रमाणात जाणवायला सुरुवात होते. आपल्या वजनाचे जास्त ओझे हे आपल्या गुडघ्यावर पडलेले असते. त्यामुळे त्या वेदना या असह्य होतात.

दुखापतीच्या वेळी जास्त लक्ष द्या —

आपल्या गुडघ्यांना जर कोणत्याही प्रकारची दुखापत झाली असेल तर त्यावेळी आपण त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. त्यामुळे कदाचित जास्त त्रास हा जाणवू शकतो.

मांसपेशींसाठी व्यायाम करा —-

आपल्या शरीरात जर मांसपेशी या जास्त प्रमाणात वाढत असतील तर त्यावेळी सुद्धा आपण आपल्या शरीरात असणाऱ्या मांसपेशीं कमी होण्यासाठी कमीत कमी सकाळ संध्याकाळ काही प्रमाणात व्यायाम करणे आवश्यक आहे.

गुडघा मोडला असेल तर … —–

गुडघा दुखी जे प्रमाण जास्त असेल तर त्यावेळी कदाचित गुडघ्यामध्ये काही किंचितसा फॅक्चर असू शकतो त्यामुळे वेळीच त्याच्यावर इलाज करणे आवश्यक आहे.