These mistakes should not be made by the bride for the wedding ceremony

नववधू यांनी लग्नसोहळ्यासाठी करू नयेत या चुका 

हॅलो आरोग्य ऑनलाईन । लग्न म्हंटलं कि , एक नवीन पर्वणी असते नव्या गोष्टींची नव्याने होणारी सुरुवात हि लग्नसोहळ्याच्या निमित्ताने होत असते. लग्नसोहळा असलं कि , प्रत्येक मुलगी आपण सुदंर दिसावे याचा विचार करत असते . त्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट आपल्या चेहऱ्यासोबत आपल्या केसांच्या बाबतीत सुद्धा करत असतात. केस मुलायम आणि सुदंर दिसण्यासाठी केसांच्या वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट करून त्याच्यावर कलरिंग सुद्धा केले जाते . अश्या वेळी काही ट्रीटमेंट या आपल्या केसाच्या वाढीसाठी अजिबात योग्य नसतात. त्यामुळे आपल्या केसांच्या योग्य ट्रीटमेंट साठी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती घेऊया …

लग्नासाठी प्रत्येक मुलगी हि आपल्या चेहऱ्यावर आणि केसांसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करत असतात. ज्यासाठी कितीतरी महिने आधीच ती तिच्या त्वचा आणि केसांची अधिक काळजी घेण्यास सुरूवात करते. लग्नाआधी तीन ते सहा महिने व्यवस्थित ब्युटी रूटीन फॉलो केलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. मात्र होतं काय कधी कधी या काळात तुमच्याकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे तुमचा लग्नाचा लुक खराब होऊ शकतो. यासाठीच त्वचेसोबतच तुम्ही तुमच्या केसांचीदेखील विशेष काळजी घ्यायला हवी.

लग्नाच्या दिवशी केस धुणे —

काही मुलीना सतत हेअर वॉश करण्याची सवय असते . जर तुम्ही लग्नाच्या दिवशीच केस धुतले तर त्याचा परिणाम हा आपल्या चेहऱ्यावर जाणवायला सुरुवात होते . काही दिवस अगोदर किंवा लग्नाच्या एक दिवस अगोदर केस धुणे योग्य राहील . कारण मग त्यामुळे हेअर स्टाइल हि व्यवस्थित करू शकणार नाही . ओलसर केसांसाठी हेअर स्टाइल हि उत्तम रित्या जमू शकत नाही . त्यामुळे तुमच्या सौदर्यात कमीपणा दिसून येतो. जर केसांना जास्तच हळद लागली असेल तर त्यावेळी केसाच्या हळदीसाठी ओल्या फडक्यांच्या मदतीने केस स्वच्छ करू शकता. पण धुणे मात्र नकोच .

ब्रायडल फुटवेअरचे प्रकार—-

लग्नासाठी मुलींच्या चपला हा महत्वाच्या असतात . त्या काळात विशेष अशीच चपला वापरल्या जातात. चपला निवडताना जास्त उंच टाच असलेली निवडू नये . त्यामुळे कदाचित तुम्हाला चालावे लागले तर पायांचा त्रास हा जास्त होऊ शकतो. जास्त जड सुद्धा चपला निवडू नयेत. त्याने कदाचित तुमच्या पायाला त्रास हा जास्त जाणवू शकतो.

हेअरस्टाईलसाठी ट्रायल न घेणं —-

ब्रायडल लुकसाठी मेकअप, हेअरस्टाईल आणि पेहरावाची आधी एक ट्रायल घेतली जाते. काही जणी मेकअप आणि कपड्यांची ट्रायल घेतात. मात्र हेअरस्टाईलची ट्रायल घेणं टाळतात. असं मुळीच करू नका. कारण तुमच्या मनात असलेली हेअरस्टाईल तुमच्या केसांवर चांगली दिसेलच असं नाही. तुम्हाला आवडणारी हेअरस्टाईल तुमच्या चेहरा आणि वेषभूषेला साजेशी आहे का हे तुम्हाला आधीच पाहावं लागेल. यासाठी कमीतकमी पंधरा दिवस आधी ब्रायडल लुकची ट्रायल जरूर घ्या. हे करताना कमीत कमी आपल्या केसांची हेअर स्टाइल करून तुम्ही घ्या. म्हणजे तुमचा लुक कसा असावा याची कल्पना येईल .

लग्नाच्या एक-दोन दिवस आधी हेअर कलर करणं ——-

केस कलर केल्यावर ते सेट व्हायला काही दिवस नक्कीच जातात. यासाठीच हेअर कलर काही दिवस आधी करणं गरजेचं असतं. पंधरा दिवस आधी अथवा महिनाभर आधी हेअर कलर करणं एक चांगला पर्याय आहे. कलर करताना नेहमी केस स्वच्छ असणे गरजेचे आहे.

कोणताही प्लॅन नसणं —–

कधी कधी तुमच्या ठरलेल्या गोष्टी पूर्ण होत नाहीत त्यावेळी कधीकधी तुम्ही ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडत नाही. मात्र यात काहीच चुकीचं नाही. त्यामुळे उगीच चिडचिड करत बसू नका. तुमच्या सगळ्या गोष्टी या बॉबी पिन वगैरे हेअर पिन व्यवस्थित ठेवा . त्यामुळे आपल्याला शोधा शोध सुरु होते. अश्या वेळी एखादी वस्तू जास्त बाळगा .