Healthy Lifestyle
|

उत्तम आरोग्यासाठी ‘या’ नियमांचे पालन अत्यावश्यक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन| नवीन वर्षाच्या सुरुवातीला वाटल होत की यंदाच वर्ष सुख समाधान आणि शांतता घेऊन येईल. पण यंदाही कोरोना विषाणू आपला कहर कायम ठेऊन आहे. उलट यावेळी तर कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन आला आहे. एव्हाना या विषाणूने जगभरातील अनेक देशांमध्ये हातपाय पसरले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे प्राधान्याची बाब होऊन बसले आहे. फिटनेस असो वा डाएट, हेल्थ याबाबत काही ठरवत असाल, तर काही सोपे नियम आधी पाळा. तरच याचा फायदा होईल. आता हे नियम कोणते? तर हे नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे :-

१) शारीरिक स्वच्छता महत्वाची –

वैयक्तिक स्वच्छता

कोरोना असो वा अन्य कोणताही संसर्गजन्य विषाणू त्यापासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे समजून घ्यायला हवे. यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या शारीरिक स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. शिवाय आपण वापरात असलेला मास्क स्वच्छ आणि कोरडा असेल याची काळजी घ्या. बाहेर कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर सॅनिटायझरचा वापर करा. स्वच्छ हातरुमाल वापरा.

२) दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्याच –

नियमित पाणी प्या

हा नियम केवळ विषाणूच्या भीतीपोटी नव्हे तर आयुष्यभराच्या सुरक्षिततेसाठी गरजेचा आहे. कारण शरीरातील पाण्याची कमतरता मोठमोठ्या आजारांचे कारण होऊ शकते. त्यामुळे फिट राहण्यासाठी हा नियम पाळणे गरजेचे आहे. दररोज ८ ते १० ग्लास पाणी अर्थात ३ ते ४ लिटर पाणी पिणे अनिवार्य आहे. यामुळे आपल्या शरीरात असणारे टॉक्सिन्स शरीराबाहेर फेकले जातात. यामुळे कोणताही आजार होण्याचा धोका कित्येक पटींनी कमी होतो.

३) साखर- मिठाचा कमी वापर करा –

साखर – मीठ

भरपूर गोड आवडत असेल तरीही कमी साखर खाण्याची सवय ठेवा. याशिवाय आहारात मिठाचादेखील शक्य तितका कमी वापर करा. यामुळे आपल्या शरीरात संतुलन राहते. अन्यथा मिठाचे अति सेवन रक्तदाबाच्या समस्येला प्रोत्साहन देते. तर साखरेचे अति सेवन मधुमेहासारख्या आजाराला आमंत्रण देते. त्यामुळे आहारात साखर आणि मीठ हे दोन पदार्थ कमीच वापरा.

४) पूर्ण झोप आणि नियमित व्यायाम आवश्यक –

पूर्ण आराम

जर तुमचे मन, मेंदू आणि शरीर निरोगी असावे असे तुम्हाला वाटत असेल तर पूर्ण झोप आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. यासाठी दररोज किमान १ तास व्यायाम करा. तसेच दररोज रात्री किमान ७ ते ८ तासांची झोप घ्या. यामुळे मन, मेंदू आणि शरीर उत्साही तसेच सक्रिय राहतील.

५) पूर्ण आणि पौष्टिक आहार घ्या –

पौष्टिक आहार

आपलं वय, वजन, उंची, कामाचं स्वरूप, व्यायाम यानुसार आपला आहार कसा आणि किती असावा याविषयी डॉक्टरांशी किंवा आहार तज्ञांशी सल्ला मसलत करा. त्यानुसार तुमचा डाएट प्लॅन आखून घ्या. रोजच्या आहारात अरबट चरबट आणि जिभेचे चोचले पुरविणारे अन्न खाण्यापेक्षा शरीराला आवश्यक तत्त्वांची पूर्तता करणारे अन्न खा.