| |

शरीरातील रक्त वाढविण्यासाठी ‘हे’ पदार्थ करतील मदत; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। शरीरात कार्य करण्याची क्षमता टिकून राहण्यासाठी आपल्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिल्ने अत्यंत गरजेचे असते. यासाठी आपल्या आहारात काही विशेष पदार्थांचा समावेश असणे गर्जे आहे. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आहाराकडे लक्ष देणे अनेकांना जमत नाही. परंतु यामुळे आहार चुकविणे किंवा यावेळी खाणे अश्या सवयी अंगाला लावून घेणे म्हणजे आजारांना आयते आमंत्रण दिल्यासारखेच आहे. आजकाल प्रामुख्याने स्त्रियांमध्ये अ‍ॅनिमियाची समस्या अर्थात शरीरात रक्त कमी असण्याची समस्या अधिक प्रमाणात आढळते. याकरिता चुकीची जीवनशैली आणि चुकीची खानपान योजना कारणीभूत आहे. आपले शरीर निरोगी आणि आरोग्य स्वस्थ हवे असेल तर यासाठी शरीरात योग्य प्रमाणात रक्त असणं आवश्यक आहे. अन्यथा अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून आपण आज शरीरातील रक्त कमी झाल्यामुळे होणारे परिणाम जाणून घेणार आहोत. याचसोबत रक्ताची कमतरता भरून काढणारे पदार्थ कोणते ते देखील आपण जाणून घेणार आहोत. खालीलप्रमाणे:-

० शरीरातील रक्त कमी झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?
– आपले आरोग्य जपणे हि आपली वैयक्तिक जबाबदारी असते. तसेच आपले शरीर सुदृढ असेल तर निरोगी आरोग्य मिळणे अगदी साहजिक आहे. पण याकरिता आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि संचरण दोन्ही व्यवस्थित सुरु असणे गरजेचे असते. कारण रक्त तयार होण्याचे प्रमाण कमी झाल्यास हाडं कमजोर होतात. शिवाय याचा परिणाम थेट डोळ्यांच्या दृष्टीवरही होतो. या व्यतिरिक्त मेंदूच्या कार्यावरसुद्धा याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. परिणामी विस्मृतीचा त्रास होतो. अनेकदा आरोग्याच्या लहानसहान वाटणार्‍या समस्येमागे शरीरातील रक्ताची कमतरता कारणीभूत असते. म्हणून खाली दिलेले पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करा आणि नैसर्गिकरित्या शरीरातील रक्ताचे प्रमाण संतुलित करा.

१) हरभरा – हरभऱ्याच्या डाळीमध्ये आयर्नची मात्रा भरपूर असते. त्यामुळे शरीरात आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठी हरभरा मदत करतो. परिणामी शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते आणि हिमोग्लोबीनची पातळी सुधारण्यास मदत होते.

२) पालक – पालक हि एक हिरवी पालेभाजी असून तिला आयुर्वेदामध्ये रक्तवर्धक म्हणून एक वेगळे स्थान आहे. त्यामुळे जर शरीरात रक्ताची कमतरता असेल तर पालकच्या पानांचा रस नियमित प्यायल्यास फायदा होतो. परिणामी शरीरातील रक्ताची कमतरता कमी वेळात भरून निघते आणि इतर समस्यांना रोख लागतो.

३) बीट – शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी कंदमुळांपैकी बीट अत्यंत फायदेशीर आहे. कारण बीटातील सत्त्वे शरीरातील रक्ताची कमी झालेली पातळी वेगाने भरून काढण्यास फायदेशीर असतात. त्यामुळे आहारात सलाडपासून अगदी गोडाच्या पदार्थांपर्यंत बीटाचा समावेश करा. लहान मुलांना सकाळी नाश्त्यावेळी बीटाचा रस आणि पराठे खायला द्यावेत.

४) सफरचंद – आपल्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाले असेल तर सफरचंद खाणे लाभदायक आहे. यासाठी सफरचंदासोबत मध मिसळून खा. परिणामी शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.

५) डाळिंब – शरीरातील रक्ताची पातळी कमी झाल्यास कमी वेळात अधिक रक्त वाढवण्यासाठी डाळिंब अत्यंत फायदेशीर आहे. कारण डाळिंबामध्ये आयर्न मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील रक्त वाढण्यासाठी डाळिंब मदत करते. परंतु डाळिंबाच्या रसाऐवजी डाळिंब असेच खाणे जास्त फायद्याचे आहे.

६) खजूर – खजूर शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करतो. यासाठी दूधात खजूर मिसळून प्यायल्याने फायदा होतो.

७) खारीक – खजुराप्रमाणे खारीक पूडदेखील रक्त वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी फ्रुट सलाडमध्ये खारकेचे तुकडे किंवा दूधात खारीक पूड मिसळून प्यावे.