If the lips become lifeless in winter ....
| |

ओठांवरील ‘हि’ लक्षणे दर्शवितात लीप कॅन्सरचा धोका; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सर्वसाधारणपणे ओठांचा रंग हा गुलाबी आणि मादक असतो. शिवाय ओठांची रचना आणि रंग हा सौंदर्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे. पण जर तुमच्या ओठांची रचना, रंग आणि इतर प्रत्येक बारीक गोष्टींमध्ये फरक दिसून येत असेल तर..? कधी विचार केलाय..? नाही..? मग आता करा. कारण ओठांच्या आरोग्याकडे लक्ष न देणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत त्रासदायी ठरू शकते. कारण कर्करोगाचे अनेक प्रकार असतात ज्यामध्ये ओठाचा कर्करोगदेखील असतो. यामध्ये ओठांच्या रंगाकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.

ओठांचा कर्करोग हा असा रोग आहे जो सहज कळून येत नाही. कारण या कर्करोगाची लक्षणे स्वाभाविकपणे समजायलाच वेळ लागतो. परिणामी तो वाढतच जातो आणि यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाते. म्हणून आज आपण ओठांच्या कर्करोगाची कारणे आणि याचसोबत लक्षणेदेखील जाणून घेणार आहोत.

ओठांचा कर्करोग होण्याची कारणे:-

1. अति धूम्रपान करणे.

2. गुटखा आणि तंबाखूचे सेवन करणे.

3. तोंडाची अस्वच्छता.

4. नियमित लीप मेकअप करणे.

5. ओठाच्या जखमांकडे दुर्लक्ष करणे.

6. ओठांना संसर्ग होणे.

ओठांचा कर्करोग झाल्याची लक्षणे:-

1. ओठांवर सूज येणे.

2. ओठ पांढरे होऊन सालपट निघणे.

3. ओठ फाटणे.

4. ओठांना वारंवार जखमा होणे.

5. ओठ काळे निळे दिसणे.

6. ओठांवर लाल चट्टे किंवा पांढरे पट्टे दिसणे.

० ओठांचा कर्करोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

ओठांचा कर्करोग होऊ नये, म्हणून सर्वांत महत्त्वाचं म्हणजे गुटखा किंवा तंबाखूचं सेवन करू नये. शिवाय धूम्रपानही टाळावं. कारण ओठांचा कर्करोग होण्याचं हेच मुख्य कारण आहे. यामुळे ओठांवर सूज येते. शिवाय तोंडाची स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. तसंच तोंडाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्या. ओठांच्या कर्करोगाची लक्षणं दिसून आल्यावर वेळीच उपाय केल्यास यापासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.