Increase proteins from these rich foods
|

हे दोन्ही जीवनस्त्वव अजिबात एकत्र घेऊ नये, कारणे घ्या जाणून

हॅलो आरोग्य  ऑनलाईन । आपल्या शरीराच्या आवश्यकतेसाठी किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्या शरीरात वेगवेगळ्या जीवनसत्वचा समावेश असणे गरजेचे आहे पण त्यासाठी काही जीवनसत्वे एकत्र घेणे आरोग्याच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. कॅल्शियम आणि आयरन याचा काही अंशी भाग हा आपल्या आहारात एकत्र नाही गेला पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरीराला त्रास होणार नाही . जर दे दोन्ही घटक एकत्र शरीरात गेले तर मात्र शरीराच्या इतर समस्या या निर्माण होऊ शकतात.

शरीरात कॅल्शियमची कमतरता झाल्यामुळे हाडे कमकुवत होतात अशा परिस्थितीत हाडं मोडण्याची किंवा फ्रॅक्चर होण्याची समस्या उद्भवू शकते. डॉक्टरांच्या मते शरीरात आयरन आणि कॅल्शियमच्या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आहारात काही अन्नाचा समावेश देखील करू शकता या शिवाय डॉक्टर अनेक प्रकाराचे पूरक आहार घेण्याच्या सल्ला देखील देतात. पण त्यावेळी कॅल्शियम युक्त आणि आयरन युक्त पदार्थ आपल्या आहारात घेतले जाऊ नयेत.

कॅल्शियम आणि आयरन ची कमतरता झाली असल्यास काय करावं —-

आयरन असलेले पदार्थ जेवणाच्या वेळेत घेऊ नये, जर घ्यायचे असेल तर त्या वेळी आपल्या आहारात काही वेळाचे अंतर असणे गरजेचे आहे. जेवणाच्या अगोदर किंवा जेवण झाल्यानंतर काही प्रमाणात आयरन युक्त आहार घ्यावा. कॅल्शियम किंवा आयरन ची कोणतेही गोळी घेताना तुम्ही ती गोळी कधीही अनोश्यापोटी घेतली जाऊ नये. गरोदर बायकांना या गोळ्या नेहमी घ्याव्या लागतात. त्यामुळे त्या स्त्रियांनी तर कोणताही पदार्थ खाऊनच अश्या गोळ्या घेतल्या पाहिजेत. त्या दोन्ही गोळ्यांच्या मध्ये साधारण १ तासाचं अंतर असणे गरजेचे आहे.

दुधात कॅल्शियम असतं, म्हणून जर आपण आयरन च्या गोळ्यासह दुधाचे सेवन करता तर शोषणात अडथळा येतो. असेच कॅल्शियमच्या गोळ्यांचे देखील आहे ते देखील आयरन च्या शोषणात अडथळा आणतात. म्हणून या दोन्ही गोळ्यांना घेण्याच्या वेळेत काही अंतर राखायला हवा. आयरनच्या गोळ्या खाल्ल्याने आपल्याला बद्धकोष्ठता, अतिसार, किंवा पोटाशी संबंधित इतर त्रास देखील होणं सामान्य आहे. याच्या सेवनाने आपल्या शौचाचा किंवा मळाचा रंग देखील काळा होतो. त्यामुळे या दोन्ही गोळ्यांचे मिश्रण हे एकत्र घेतले गेले नाही पाहिजे.