Vegetables
| | |

शरीरातील प्रोटीन वाढविण्यासाठी ‘या’ भाज्या अत्यंत सहाय्यक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या उत्तम आरोग्यासाठी महत्वाचं काय आहे? असं जर कुणी विचारलं तर तुम्ही पटकन सांगाल कि आहार. पण आपला आहार खर्च आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे का हे किती जणांनी तपासून पाहिले आहे? मित्रांनो उत्तम आरोग्यासाठी केवळ आहार गरजेचा नसतो तर सकस आणि पूर्ण आहार गरजेचा असतो. कारण शरीराला आहारातून पूर्ण पोषण मिळणे आवश्यक असते. आपल्या शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने (Protein), फायबर, जीवनसत्वे आदींची आवश्‍यकता असते. अनेकदा या घटकांच्या कमतरतेमुळे आपल्याला कृत्रिमरित्या त्यांची कमी भरुन काढावी लागते. पण याचा अनेकदा अनेकांच्या शरीरावर उलटा परिणाम होतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा काही भाज्यांची ओळख करून देणार आहोत, ज्यांच्या सहाय्याने तुम्ही शरीरातील प्रोटीनची कमतरता अगदी सहज भरून काढू शकता.

आपल्या शरीरासाठी प्रोटीन खूप आवश्यक असते. कारण शरीरातील अनेक कार्यांसाठी प्रोटीन मदत करते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पुरेशा प्रमाणात प्रोटीनचे सेवन केलेच पाहिजे. म्हणून प्रोटीनची मात्र संतुलित ठेवण्यासाठी वरील भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करा. या भाज्या प्रोटीनयुक्त आहार असून आपले वजन कमी करण्यास मदत करतात. शिवाय शरीराला बळकटी देतात आणि हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. निश्चितच मांसाहारी लोकांना प्रोटीन पुरेशा प्रमाणात मिळते. पण या भाज्या खाल्ल्यामुळे शाकाहारी लोकांनादेखील पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळवता येईल.