|

‘हे’ पदार्थ व्हेज नाही नॉनव्हेज आहेत; पटत नसेल तर जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। बदलत्या जीवनपद्धतीनुसार माणसांचे राहणीमान बदलले मात्र चवी आणि आवडी निवडीत आजही शाकाहारी – मांसाहारी असे प्रकार स्थित आहेत. कारण अनेकांना मांसाहार पूर्ण वर्ज्य असतो. त्यामूळे हे लोक फक्त शाकाहार करतात. पण, बाजारात असे कितीतरी पदार्थ मिळतात जे समजांप्रमाणे आणि त्यातील जिन्नसांच्या गुणधर्मानुसार शाकाहारी वाटतात. पण मुळात ते मांसाहारी असतात. मांसाहारी म्हणजे प्राणिजन्य घटकांपासून त्यांची निर्मिती झालेली असते. त्यामुळे या पदार्थांबाबत आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात हे पदार्थ कोणते ते.

१) साखर – आता तुम्ही म्हणाल साखर मांसाहारी कशी काय असू शकते? पण मुळात साखर ही प्राणिजन्य घटकाचा वापर करून बनवलेली असते. अनेक ठिकाणी साखर नैसर्गिकरित्या ब्लिच म्हणजे शुभ्र केली जाते. त्यात जनावरांच्या हाडांचा उपयोग केला जातो. इतकेच नव्हे तर ब्राऊन शुगरमध्येदेखील या घटकाचा वापर होतो.

२) खारे शेंगदाणे – अनेको मोठमोठ्या ब्रँड्सच्या खाऱ्या शेंगदाण्यांमध्ये मसाले आणि मीठ मिसळण्यासाठी जिलेटिनचा पूर्ण वापर केला जातो आणि हा पदार्थ प्राणिजन्य घटक आहे. त्यामुळे खाऱ्या शेंगदाण्याचा यात समावेश होतो.

३) चीज – चीज खाणाऱ्यांचा एक मोठा चाहतावर्ग आहे. पण चीजसुद्धा संपूर्णतः शाकाहारी नाही. काही खास प्रकारच्या चीजमध्ये रेन्नेट नावाचा घटक असतो. हा घटक वासराच्या पोटातून काढला जातो. त्याचा वापर चीजला घट्टपणा येण्यासाठी करतात. परंतु बाजारात हे घटक न मिसळलेले चीजदेखील उपलब्ध असते.

४) सॉफ्ट ड्रिंक – सॉफ्ट ड्रिंक असा प्रकार आहे ज्यात जिलेटिनचा वापर केला जातो आणि हा पदार्थ जनावरांच्या अवयवांपासून बनतो. याचा वापर सॉफ्ट ड्रिंक्सना दाटपणा येण्यासाठी केला जातो.

५) बारबेक्यु पोटॅटो (बटाटा) चिप्स – बारबेक्यु पोटॅटो चिप्समध्ये चिकन फॅट्स मिसळलेले असू शकतात. विशेष म्हणजे त्याचा उल्लेख पॅकेटवर केलेला असतो. त्यामुळे खातेवेळी तो तपासून घ्यावा लागतो.

६) व्हॅनिला आईस्क्रीम – व्हॅनिला आईस्क्रीममध्ये ऑटर प्राण्याच्या अवयवांपैकी काही घटकांचा वापर केलेला असतो. त्याला कॅस्टोरम म्हणतात. याचा वापर आईस्क्रीमला व्हॅनिला फ्लेवर देण्यासाठी केला जातो. तसे पाहता हे खाण्याने काही नुकसान होत नाही. पण माहितीसाठी या पदार्थाचा उल्लेख केला आहे.

७) ओमेगा 3 – ज्या पदार्थांमध्ये ओमेगा 3 हा घटक समाविष्ट असतो ते पदार्थ शाकाहारी नसून मांसाहारी असतात. मुळात हा घटक डोळ्यांना दिसणारा नसतो पण पदार्थांमध्ये समाविष्ट असतो. यात मास्यापासून मिळणारे काही घटक मिसळलेले असतात. ओमेगा 3 अळशी, चिया सीड्स आणि अक्रोड यांमध्ये प्रामुख्याने आढळते.