What are the causes of irregular menstruation

महिलांची मासिक पाळी लेट होण्याची ‘हि’ आहेत कारणे

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  मुली वयात आल्यानंतर त्यांना मासिक पाळी हि ठराविक वयानंतर सुरु होते. मासिक पाळी हि प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला असते. काही मुलींच्या मासिक पाळीच्या तारखा या २८ दिवसानंतर किंवा ३० आणि ३२ दिवसानंतर असतात. पण प्रत्येक महिन्याला न चुकता मासिक पाळी हि येतच पण जर कधी उशीर पण होऊ शकतो. पण त्याची कारणे हि वेगवेगळी असू शकतात. त्याची कारणे कोणकोणती आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात ….

मुलीच्या शारीरिक आणि मानसिक असलेला ताण —

अनेक वेळा मुलींना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते . कधी मानसिक समस्या असतात. तर कधी त्यांना शारिरीक समस्यांना समोरे जावे लागते. अश्या वेळी त्यांच्या प्रत्येक महिन्याच्या मासिक पाळीत काही ठराविक दिवसांचे अंतर हे वाढतच जाते. ताणामुळे मुलीच्या शरीरात GnRH नावाच्या हार्मोनचे प्रमाण कमी होतं ज्यामुळे ओव्युलेशन किंवा पीरियड्स येत नाही.

आजार —

जर मुलींना वेगवेगळ्या आजारांना समोरे जावे लागत असेल तर त्यावेळी सुद्धा त्यांच्या मासिक पाळीमध्ये खूप मोठा गॅप तुम्हाला जाणवू शकतो. मुलींना जर सर्दी , खोकला आणि किंवा अस्थमा याचा आजार असेल तर त्यावेळीस मुलींच्या मासिक पाळीमध्ये खूप फरक हा जाणवू शकतो.

ब्रेस्टफीडिंग—-

लहान मुलांना ब्रेस्टफीडिंग करतात. अश्या वेळी अनेक महिलांना पीरीयड्स येतच नाही. त्यांचा कालावधी पण पूर्ण झालेला नसतो.

कमजोर किंवा कमी वजन असणे—-

आपल्या शरीरात पुरेसे फॅट्स नसल्यास पीरीयड्स लांबतात. नियमित पाळी यावी यासाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक असतं. कमी वजन असलेल्या मुलींना या समस्येला सामोरे जावेच लागते. तसेच ज्या महिलांना थायराइड आणि थायराइडसंबंधी समस्या असल्या याचा थेट परिणाम पाळीवर होतो.

लठ्ठपणा —

महिलांचे वजन जर जास्त असेल तर त्यावेळेस सुद्धा या मासिक पाळीच्या समस्येला सामोरे जावे लागते.