If stomach bloating problems increase after a meal .......
| | |

पोटात गॅस होण्याच्या समस्येवर ‘हा’ काढा देईल आराम; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकांना काहीही खाल्ल्यानंतर गॅस आणि अपचन होण्याची समस्या त्रास देते. यासाठी बरेच लोक बरेच उपचार घेतात. पण काहींना त्या उपचारांनी आराम मिळतो तर काहींना आणखीच त्रास होऊ शकतो. अशा समस्यांवर आराम हवा असल्यास सर्वात आधी आहारावर नियंत्रण आणि काय खावे त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यानंतर आयुर्वेदिक अर्थात हर्बल उपचार घ्यावे. यामुळे कोणत्याही हानीशिवाय गॅसेसच्या समस्येतून सुटका होऊ शकते.

विशेषतः खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी पोटाच्या तक्रारींना आमंत्रण देतात. यामुळे पोटात जडपणा, गॅस, ऍसिडिटी, मळमळ आणि बद्धकोष्ठता यांसारखे विकार संभवतात. अर्थात ही समस्या नाही. मात्र दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम करणारी आहे. त्यामुळे अशा समस्येवर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. यासाठी आज आपण एक सोप्पा काढा बनविण्यासाठी लागणारे साहित्य, कृती आणि त्यातील घटकांचे फायदे जाणून घेणार आहोत. हा काढा पचनाशी संबंधित सर्व समस्यांवर प्रभावी आहे.

आयुर्वेदिक काढा बनविण्याची पद्धत:-

० साहित्य – कढीपत्त्याची १ काडी, पुदिन्याची १० ते १२ पाने पाने, १ इंच ताजे आले किंवा १ टीस्पून सुंठ पावडर, ३ ग्लास पाणी.

० कृती – एका भांड्यात पाणी घेऊन गॅसवर गरम करा. आता यात कढीपत्ता आणि पुदिन्याची पाने घालून उकळवताना सोबतच ताजे आले वा सुंठ पावडर मिसळा. हे मिश्रण साधारण ७ ते १० मिनिटे चांगले उकळवा आणि गरम झाल्यावर गाळून घ्या. गरम असतानाच हा काढा प्या.

पुदिना व कडीपत्त्याचे फायदे:-

वरील प्रत्येक घटकांमध्ये अँटीडायबिटीक, अँटीडायरियल, अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल, अँटीकार्सिनोजेनिक, अँटीहाइपरटेन्सिव्ह, अँटीयुल्सर, अँटीबॅक्टेरियल आणि कोलेस्ट्रॉल कमी करणारे तसेच इतर अनेक उपयुक्त औषधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे हा प्रत्येक घटक शरीराची काळजी घेण्यास फायदेशीर ठरतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *