| | |

‘हे’ फूड कॉम्बिनेशन आरोग्यासाठी अतिशय घातक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दिवसभरात आपण काय खातो, किती खाती, कधी खातो या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडत असतो. अनेकदा आपण अख्ख्या दिवसभरात शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांतून अधिक पोषणाचे सेवन करतो तर कधी कमी. इतकेच नव्हे तर कधी कधी आपण आहारातून अश्या पदार्थांचे कॉम्बिनेशन खातो ज्यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहचते. यानंतर अनेको आजार आपल्या शरीरात घर करू लागतात. याची प्रमुख लक्षणे म्हणजे केस गळणे, थकवा, त्वचेवर डाग, फोड येणे, आळस, पोट बिघडणे, ऍसिडिटी, डोकेदुखी, अंगदुखी. यापेक्षा अधिक म्हणजे सर्व पोषक पदार्थ खाऊनही वजन वाढत नाही किंवा कमी होत नाही असे झाले तर समजून जा कि तुमच्या आहारात काहीतरी गडबड आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला असे काही कॉम्बिनेशन सांगणार आहोत जे खाल्ल्याने आरोग्याचे १००% नुकसान होते. त्यामुळे हे पदार्थ एकत्र खाणे प्रामुख्याने टाळा आणि स्वतःचे आरोग्य जप. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) दूध – दुधात प्राणिजन्य प्रथिने असतात. त्यामुळे दुधासोबत काही इतर पदार्थ खाणे आरोग्याचे नुकसान करू शकते. यामुळे त्वचेचे विकार आणि पोटाचे आजार होऊ शकतात. यामुळे दुधाबरोबर कधीही अंडे, मांस – मच्छी, कांदा, केळ, फरसाण, आंबट फळे, ऍसिडिक फळे, मुळा, फणस, वांगी हे पदार्थ खाऊ नये. यामुळे अन पाचट नाही आणि त्वचारोग संभवतात.

२) दही – दुधाप्रमाणेच दह्यासोबतदेखील फळे खाऊ नये. यामुळे कफ होतो. हा कफ फुफ्फुसात बसतो आणि infectionचा धोका वाढतो. दही आणि उडीद एकत्र खाणेदेखील घातक आहे. त्याने अचानक रक्तदाब वाढतो आणि हृदयविकार होतात. त्यामुळे दहिवाद चवीला उत्तम असला तरीही आरोग्यासाठी उत्तम पर्याय नाही.

४) तूप – तूप तांब्याच्या भांड्यात ठेवले असेल तर खाऊ नका. वारं मुळातच तूप तांब्याच्या भांड्यात साठवणे आरोग्यदायी नसते. त्यामुळे तूप विषारी होते आणि आरोग्याला नुकसान पोहचवते.

३) बीयर आणि कोल्ड्रिंक्स – अश्या प्रकारच्या पेयांसोबत खरे शेंगदाणे, ड्रायफ्रूट खाणे आरोग्यदायी नाही त्यामुळे अश्या सवयी असतील तर आधीच सोडा. कारण बीयर, कोल्ड्रिंक्स पिल्यानंतर शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यात खारट पदार्थ खाल्ले तर शरीरातील सोडियम झपाट्याने वाढते आणि पाणी पातळी अजूनच घटते. ह्यामुळे चक्कर येणे, जीव घाबरणे, उलट्या होणे, घाम येणे अशी लक्षणं दिसून येतात.

५) टोमॅटोसोबत काकडी आणि गाजरसोबत लिंबू – टोमॅटो आणि काकडीची एकत्र कोशिंबीर कधीच खाऊ नये यामुळे जेवण पचतही नाही आणि पॉट प्रचंड फुगून गॅसची समस्या होते. तसेच गाजर आणि लिंबू एकत्र करून खाल्ल्याने छातीत जळजळ होते आणि मूत्रविकार होतात.

६)थंडसोबत गरम पदार्थ – जेवणामध्ये किंवा जेवणानंतर लगेच अतिथंड किंवा अति गरम पेय घेऊ नये. यामध्ये आईसक्रीम, कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी ह्याचा समावेश होतो. यामुळे शरीराचे तापमान अचानक अस्थिर होऊन ताप येण्याची शक्यता असते.

७) मांसाहारासोबत दुग्धजन्य पदार्थ – मांसाहार करताना दूध, दही, चीझ, मोड आलेले पदार्थ, बटाटा, स्टार्च इ. पदार्थ खाणे टाळावे. तसेच मांसाहारी पदार्थ तिळाच्या तेलात बनवू नये. यामुळे शुगर वाढणे, वजन वाढणे आणि गॅसेस या समस्या वाढतात.