| |

शीतपित्ताचा त्रास असेल तर हि माहिती तुमच्याचसाठी आहे; जरूर वाचा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। शीतपित्ताचा त्रास अगदी सर्वसामान्य आहेत. आजकल हा त्रास अनेक लोकांमध्ये दिसून येतो. या त्रासात त्वचेवर पित्ताच्या लालसर पुरळ उठतात आणि त्वचेवर खाज सुटते. या शीतपित्ताच्या त्रासाला वैद्यकीय भाषेत अर्टिकेरिया म्हणतात. तर अगदी सामान्य बोलीभाषेत ‘अंगावर पित्त उठणे’ असे म्हणतात. चला तर जाणून घेऊयात शीतपित्त होण्याची लक्षणे, कारणे, घरगुती उपाय

० लक्षणे –
१) त्वचेवर पित्त उठणे.
२) लाल पुरळ येणे.
३) त्वचेवर खाज येणे.
४) त्वचेवर सूज असणाऱ्या लाल गांधी उठणे.
५) अंगावर गोल आकारात लाल चकते उठणे.

० कारणे –
१) शीतपित्ताचा त्रास ऍलर्जीमुळे होतो. एखाद्याच्या शरीराला ज्या पदार्थाची ऍलर्जी आहे, नेमके त्याच पदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर (खाणे, वास घेणे, सानिध्यात वावरणे) त्वचेत आढळणाऱ्या विशिष्ट पेशींमधून हिस्टामाइन नावाचा पदार्थ स्रवतो आणि त्याचाच परिणाम म्हणजे त्वचेवर पित्ताच्या लहानलहान लाल गाठी येतात. या गाठी आलेल्या ठिकाणी सूज येते आणि खाजही येते.

० कोणकोणत्या पदार्थामुळे ऍलर्जी होऊन शीतपित्ताचा त्रास होतो?
– काही लोकांना विशिष्ट पदार्थ खाल्यानंतर हा त्रास होतो. यामध्ये अंडी, शेंगदाणा, काजू, मासे, शेलफिश, मांसाहार, स्ट्रॉबेरी, गहू, हरभरा डाळ, तूर डाळ या खाद्यपदार्थांचा समावेश असू शकतो.

– कोणत्याही किरकोळ आजारांसाठी विशिष्ट औषधे घेत असल्यास हा त्रास होतो. यामध्ये अँटीबायोटिक्स आणि वेदनाशामक औषधे यांचा समावेश असू शकतो.

– घरात पाळलेले प्राणी जसे कि, कुत्रा, मांजर, घोडे, कोंबडी इत्यादी प्राण्यांच्या पिसांची किंवा केसांची ऍलर्जी असू शकते.

– वातावरणातील बदलते हवामान जसे कि- अतिथंड वातावरण, अतिथंड पदार्थ, सूर्यप्रकाश, अतिगरमी, गरम पदार्थ यांची ऍलर्जी असू शकते.

– हवेतील प्रदूषण, धूर, धूळ, परागकण, केमिकल्स

– टेरेलीन, टेरीकाटची अशा कपडांची ऍलर्जी असू शकते.

० घरगुती उपाय –
१) पित्तामुळे अंगावर आलेल्या लाल पुरळवर आमसुले पाण्यात भिजवून त्याचे पाणी त्वचेवर लावावे.
२) दरम्यान त्वचा कोरडी राहू नये आणि खाज कमी व्हावी यासाठी करंज तेल अंगावर चोळावे.
३) आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाचा पाला मिसळावा. ( पाणी कोमट असावे )
४) खोबरेल तेल कोमट करून अंगाला लावल्याने लगेच फरक दिसून येतो.

० शीतपित्ताचा त्रास झाल्यास काळजी कशी घ्याल?
१) कितीही खाज येत असली तरीही खाजवणे टाळावे.
२) कोमट पाण्याने अंघोळ करावी आणि सॉफ्ट साबणच वापरावा.
३) दरम्यान सुती व सैलसर कपडे वापरावे.
४) पोट साफ राहील याकडे लक्ष द्या.