how to care of eyes

अश्या पद्धतीने घेऊ शकता डोळ्यांची काळजी

हॅलो आरोग्य ऑनलाईन । डोळे हे आपल्या अवयवांमधील सर्वात महत्वाचा अवयव आहे. त्यामुळे आपण त्याची घराच्या घरी दररोज काळजी हि घेतली पाहिजे. डोळ्याचॆ जर काळजी नाही घेतली गेली तर मात्र इतर समस्यांना सुद्धा सामोरे जायला लागू शकते. डोळे जर व्यवस्थित असतील तर मात्र आपल्याला दिसण्याचा कोणताही त्रास हा होत नाही. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आपला आहार सुद्धा चांगला असणे गरजेचे आहे. त्यासाठी दररोज च्या कामकाजातून वेळ काढत

पौष्टिक आहार—-

उत्तम आरोग्यासाठी उत्तम आहार महत्वाचा असतो. डोळे चांगले राहण्यासाठी आहार हा पौष्टिक असेल तर तुम्हाला योग्य प्रमाणात प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात. डोळ्याच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन शरीरात जाणे फारच गरजेचे असते. व्हिटॅमिन्सने युक्त असलेली फळं, भाज्या, मासे यांचा आहारात समावेश असू द्या. आहारात यांचे प्रमाण योग्य असेल तर तुमच्या डोळ्यांचे आरोग्य दीर्घ काळासाठी चांगले राहील. त्यामुळे पौष्टिक आहार घ्या

डोळ्यांवर घाला प्रोटेक्टिव्ह चष्मे—

अनेक वेळा आपण आपल्या डोळ्यांची काळजी न घेता टीव्ही च्या समोर लॅपटॉप वर अनेक कामे करत बसतो. त्यामुळे स्किनमधून अतिनील किरणे आपल्या डोळ्यांवर त्याचा प्रभाव हा जास्त पडतो. त्यामुळे आपले डोळे हे लवकर खराब होतात. अनेक वेळा आपल्याला नंबर नसला तरी आपल्याला चष्मा हा मिळतो तो चष्मा वापरा. त्यामुळे आपल्या डोळ्यांचे रक्षण हे होऊ शकते. अनेक वेळा वातावरणातील बदलामुळे सुद्धा आपल्या डोळ्यांना हा त्रास जास्त होतो. गॅजेटचा सातत्याने उपयोग करताना तुम्ही या चष्म्याचा उपयोग करु शकता. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो. शिवाय प्रवासात जर तुम्हाला धूळ- माती किंवा कचरा उडू नये असे वाटत असेल त्यावेळेही तुम्ही चष्म्याचा वापर करु शकता.

डोळ्यांना द्या आराम —

दिवसभर जे लोक लॅपटॉप किंवा मोबाइल वर काम करतात त्यांना हा त्रास जास्त होतो. पण आपल्या डोळ्यांना आराम मिळण्यासाठी काही काळ तरी लॅपटॉप पासून दूर राहणे गरजेचे आहे. जर जास्त प्रमाणात त्रास होत असेल तर अश्या वेळी कमीत कमी ५ ते १० मिनिटे तुम्ही लॅपटॉप पासून दूर राहा त्याने तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो. रात्रीच्या वेळी अजिबात मोबाइल वर काम करू नका . किंवा मोबाइल  हाताळू नका. मोबाइल मुळे आपल्या डोळयानावर जास्त ताण पडतो.

स्मोकिंग टाळा—

स्मोकिंगची सवय आरोग्यासाठी चांगली नाहीच पण डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगली नाही. स्मोकिंगमुळे मेंदूचे कार्य आणि त्याला होणारा रक्तपुरवठा खंडीत होतो. स्मोकिंगमुळे झोपेवरही विपरीत परिणाम होतो. मेंदूचे कार्य आणि अपुरी झोप या सगळ्याचा परिणाम डोळ्यांवर होतो. त्यामुळे स्मोकिंग टाळा. त्यामुळे त्याचे डोळ्यांवर होणारे परिणाम मुळीच होणार नाही.

वजन नियंत्रणात ठेवा —-

आपल्या शरीराचे वजन हे नियंत्रित असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर जास्त परिणाम हा होणार नाही. ज्या लोकांना डायबेटिस  चा त्रास आहे त्या लोकांनी तर आपल्या डोळ्यांची काळजी हि जास्त घेतली पाहिजे. क्षमतेपेक्षा जास्त वजन वाढत असेल तर ते आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. वजन वाढीचा परिणाम हा आपल्या डोळ्यांवर होतो. त्यामुळे तुम्ही दररोज आहार आणि व्यायाम याचे नियम पाळले गेले पाहिजेत.डोळ्यांसंदर्भातील कोणताही लहानसा त्रास हा हानिकारक आहे. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. वेळेतच त्याच्यावर उपाय हे केले जावेत.