| | |

हि पावसाळी भाजी करते मोठमोठ्या व्याधींचा खात्मा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पावसाळ्याच्या हंगामात काही विशिष्ट रानभाज्या उगवतात आणि या भाज्या अगदी सहजपणे बाजारात उपलब्ध देखील होतात. त्यापैकी एक भाजी म्हणजे कंटोळी. कंटोळी एक अशी भाजी आहे जिच्या (Spiny gourd) सेवनामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती खूप कमी वेळात अधिक मजबूत होते. याच सोबत शारीरिक ताकदही वाढण्यास हि भाजी अत्यंत मदतयुक्त असते. तसेच ही भाजी अनेक व्याधी आणि आजारांवर अत्यंत गुणकारक आहे. मात्र तरीही अनेकांना अद्याप या भाजीबाबत माहित असायला हवी तितकी माहिती नाही.

मुख्य म्हणजे कंटोळीच्या भाजीमध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व आढळतात. शिवाय या भाजीमध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन ए, बी१, बी२, बी३, बी५, बी६, बी९, बी१२, व्हीटामीन सी, व्हिटॅमिन डी२ आणि व्हिटॅमिन डी३ यांसह व्हिटॅमिन एच, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पॉटेशियम, सोडियम, कॉपर, झिंक असे अनेक पोषक आणि गुणकारी तत्व आहेत. यामुळे अर्थातच ह्या भाजीच्या सेवनाने मानवी आरोग्यास अत्याधिक गुणकारी फायदे होतात. कंटोळीच्या भाजीचे सेवन केल्याने विविध व्याधी अर्थात आजारांपासून आपले रक्षण होते.

– कंटोळी मानवी शरीराला विविध प्रकारच्या रोगांपासून दूर ठेवण्यास सक्षम आहे. इतकेच नव्हे तर, यामुळे अनेक रोगांपासून सुटकादेखील होते. यामुळे आयुर्वेदातही कंटोळीच्या भाजीचे अनन्यसाधारण महत्व आहे.

– डोकेदुखी, केसगळती, कानदुखी, खोकला, पोटदुखी, मूळव्याध, काविळ, डायबिटीज, लकवा, सर्पदंश, कॅन्सर, उच्च रक्तदाब, यासारख्या गंभीर स्वरुपाच्या नानाविध आजारावर कंटोळीची भाजी अत्यंत गुणकारी आहे.

– इतकेच काय तर केवळ कंटोळीच्या भाजीमूळेच आपल्या आरोग्याला गुणकारी फायदे होत नाहीत, तर कंटोळीची पानं, फुलं आणि अगदी मूळांचादेखील विविध औषधी तयार करण्यासाठी वापर केला जातो.