| |

कोणताही अल्सर असो ‘हे’ उपाय देतील आराम; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। खाण्यापिण्याच्या चांगल्या वाईट सवयींवर आपले आरोग्य अवलंबून असते. याच सवयींवर आधारीत असलेला एक भयंकर आणि त्रासदायक आजार म्हणजे ‘अल्सर’. अल्सर म्हणजे एक प्रकारची जखम. जी सतत दुखते. हि जखम वेगवेगळ्या भागांमध्ये होते. त्यानुसार या प्रकारांना नावे दिली आहेत. सर्वसाधारणपणे अल्सर मुखावाटे सुरु होतो आणि आतड्यांपर्यंत पसरतो. पचनसंस्थेतील कुठल्याही भागात अल्सर होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील आम्लाचे प्रमाण वाढणे. अल्सरचे तीन प्रकार असून हे तिन्ही त्रासदायक आहेत. पोटाशी संबंधित गॅस्ट्रीक अल्सर, आतड्यांशी संबंधित डुओडिनल अल्सर आणि घश्याशी संबंधित इसोपजेनेल अल्सर असे हे प्रकार आहेत. यांवर काही घरगुती उपाय उपलब्ध आहेत. मात्र माहित नसल्यामुळे अनेकजण या आजाराशी झुंझत राहतात. चला तर जाणून घेऊयात उपाय खालीलप्रमाणे:-

० अल्सरवर घरगुती उपाय

१) हळद – हळद अँटीसेप्टीक गुणधर्मयुक्त आहे आणि अल्सर ही एक प्रकारची जखम आहे. त्यामुळे दूधात हळद घालून पिणे फायद्याचे ठरते. यामुळे अल्सरच्या जखमेला आराम देता येतो.

२) आलं – आलं अतिशय उष्ण आहे आणि तरीही अल्सरवर प्रभावी कसे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? पण मित्रहो, अनेकदा अल्सर झाल्यानंतर बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी आल्याचे सेवन प्रभावी ठरते. त्यामुळे अल्सरवर आलं परिणामकारक औषध आहे.

३) गायीचे तूप – गायीच्या तूपामुळे शरीराला थंडावा मिळतो. यामुळे अल्सरच्या कोणत्याही प्रकारात थंडावा मिळवण्यासाठी दिवसातून किमान २ चमचे तुपाचे सेवन करा. यामुळे आतड्यांना थंडावा मिळतो. जरी तूप आवडत नसेल तरी अल्सरचा त्रास कमी करण्यासाठी तूपाचे सेवन कराच हा मुख्य सल्ला.

४) केळं आणि मध – केळं आणि मध दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु हे दोन्ही एकत्र अल्सरवर प्रभावी भूमिका दर्शवितात. यासाठी एक पिकलेलं केळ स्मॅश करून त्यात १ चमचा मध घाला आणि मिश्रण खा. यामुळे लगेच आराम पडेल. मध उष्ण असले तरीही केळ्यासोबत खाल्यामुळे त्याचा फायदा होतो.

५) गाजर आणि फ्लॉवर – गाजराचा आणि फ्लॉवरचा रस एकत्र प्यायल्याने अळसर्पासून अराम मिळतो. कारण फ्लॉवरमध्ये असलेले सल्फोराफेनचे घटक अल्सरला दूर ठेवतात. तर गाजरामधील व्हिटॅमिन E पोटातील जळजळ कमी करते.

६) शेवग्याच्या शेंगा – अल्सरचा त्रास असल्यास शेवग्याच्या शेंगा खा. कारण शेवग्याच्या शेंगामध्ये जखम भरुन काढण्याची क्षमता असते. त्यामुळे अल्सरमुळे आतड्यांना झालेल्या अंतर्गत जखमा भरुन निघायला मदत मिळते.

७) बदाम – डुओडिनल अल्सरचा त्रास असेल तर बदामाचे सेवन करा. कारण बदामामुळे तुमच्या पोटातील जळजळ कमी होते. फक्त खारे बदाम खाऊ नका. कारण त्यामध्ये मीठ जास्त असते.

८) मक्याची चपाती – मक्यापासून बनवला जाणारा रोटीचा एक प्रकार म्हणजे मक्के दी रोटी अर्थात मक्याची चपाती पोटाच्या अल्सरवर परिणामकारक ठरते. यासाठी हि रोटी आणि दही खा आणि पहा नक्कीच आराम पडेल.

९) कढी – दह्यात बेसन घालून कढी बनवा आणि खा. हि कढी पोटाची जळजळ कमी करते. त्यामुळे कढीचे सेवन जरूर करा. या कढीसोबत भात किंवा पोळी असे पदार्थ खाल्ले तरीही चालेल.

१०) फळं – फळं खाणे आरोग्यासाठी चांगलेच असते. त्यामुळे अल्सरच्या रुग्णांनाही फळं खाण्याचा सल्ला देतात. यात अगदी पाणीदार फळंसुद्धा खाल्ली तरी उत्तमच. त्यामुळे अधिकाधिक आणि कोणतीही फळे खाणे लाभदायक ठरते.

० अल्सरवर वैद्यकीय उपाय – कोणत्याही आजाराला मुळापासून काढून टाकायचे असेल तर डॉक्टरांचा सल्ला हवाच. त्यात अल्सर अत्यंत वेदनादायी त्रास आहे. त्यामुळे अल्सरवर योग्यवेळी उपचार घेणे गरजेचे आहे. जर घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्याच.
– अल्सरवर योग्यवेळी उपाय करुन घेतलात तर डॉक्टर काही औषधे देतात. ज्यांचा ठराविक दिवसांचा कोर्स असतो. तो पूर्ण करावा लागतो. शिवाय डॉक्टर सांगतील ती पथ्यही पाळावी लागतात.
– अल्सरचा त्रास जर जास्त झाला असेल तर त्यावर शस्त्रक्रिया करण्याचादेखील सल्ला दिला जातो. पण सगळ्याच अल्सरच्या प्रकारामध्ये हा सल्ला दिला जात नाही.